मुंबई | टीम इंडियाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहल हा आयपीएल 16 व्या सिजनमध्ये राजस्थान रॉयल्स टीमकडून खेळतोय. युजवेंद्र चहल या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे. चहल कायम मजेशीर व्हीडिओ शेअर करत असतो. तसेच चहल आपल्या सहकाऱ्यांसोबत गंमत करत असतो. दरम्यान चहलचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत चहल दारुच्या नशेत असल्याने त्याला स्वत:ची ही शुद्धही नसल्याचा दावा केला जात आहे.
या व्हायरल व्हीडिओत चहल आपल्या कारच्या दिशेने जाताना दिसतोय. मात्र चहलला निट चालता येत नसल्याचं दिसून येतंय. निट चालता येत नसल्याने चहलला एक व्यक्ती आधार देत कारमध्ये बसवताना दिसतोय. चहल कारमध्ये बसल्यानंतर त्याला स्वत:ची शुद्धही नसल्याचं दिसून येत आहे. या कारवर मुंबई इंडियन्सचा लोगो दिसून येतोय.
व्हायरल व्हीडिओसह दावा केला जातोय की चहल टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याच्या बर्थ डे पार्टीला गेल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत अजून नक्की माहिती नाही. तसेच चहलला या व्हीडिओत स्वत:ही भान का राहिलं नाही, या मागचं कारण नक्की काय, हे ही समजू शकलेलं नाही.
दरम्यान या व्हीडिओवरुन नेटकऱ्यांनी चहलची जोरदार फिरकी घेतली आहे. “आराम से चहल भाई, टीम को आपकी जरुरत है!”, असं हसना जरुरी है या यूजर्सने व्हायर व्हीडिओ ट्विट करत म्हटलंय. तर याच व्हीडिओवर काहींनी कमेंट केलीय. “काही नाही. धनश्रीला अय्यरसोबत पाहिलं”, अशी कमेंट राहुल चौधरी याने केलीय. तर कुणी चहलला दारुबाज म्हटलंय.
युजवेंद्र चहल व्हीडिओ व्हायरल
आराम से चहल भाई , टीम को आपकी जरूरत है !!#yuzvendrachahal pic.twitter.com/3vf6hEGRmv
— Hasna Zaroori Hai ?? (@HasnaZarooriHai) April 29, 2023
दरम्यान आयपीएल 16 व्या सिजनमधील 42 वा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात चहल प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. राजस्थानने या मोसमात 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी 5 विजयांसह राजस्थान पॉइंट्सटेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टीम राजस्थान | यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेन्ट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, डोनाव्हन फरेरा, मुरुगन अश्विन, रियान पराग सेन, रियान पराग, यज्ञपराग कुल्हे , अॅडम झम्पा, जो रूट, नवदीप सैनी, आकाश वसिष्ठ, केसी करिअप्पा, ओबेद मॅकॉय, केएम आसिफ, अब्दुल बासिथ आणि कुणाल सिंग राठौर.