RR vs RCB, IPL 2023 | विराट कोहली याचा वर्ल्ड रेकॉर्ड, सर्वांना पछाडत ठरला पहिलाच खेळाडू

| Updated on: May 14, 2023 | 5:55 PM

आरसीबीच्या विराट कोहली याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 19 बॉलमध्ये 1 चौकारासह 18 धावा केल्या. विराटने याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

RR vs RCB, IPL 2023 | विराट कोहली याचा वर्ल्ड रेकॉर्ड, सर्वांना पछाडत ठरला पहिलाच खेळाडू
Follow us on

जयपूर | इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील 16 व्या पर्वातील 60 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. राजस्थान आणि आरसीबी या दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात विजयासाठी दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. मात्र या सामन्यासाठी मैदानात उतरताच विराट कोहली याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. विराट कोहली याला या सामन्यात मोठी खेळी साकारता आली नाही. पण विराट मैदानाबाहेर जाताना त्याने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विराट कोहली यासह क्रिकेट विश्वातील पहिला खेळाडू ठरला आहे.

विराट कोहली टी 20 क्रिकेटमध्ये एका टीमकडून 250 सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. विराट आरसीबीसाठी 250 वा सामना खेळणाारा बॅट्समन बनला. विराट आयपीएल सुरुवातीपासून आरसीबीसाठी खेळतोय. विराटने आयपीएलमध्ये आरसीबीचं 235 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. तर उर्वरित 15 सामने त्याने चॅम्पियन लीग टी 20 स्पर्धेत खेळला आहे. विराट याच्यानंतर एका टीमसाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम हा चेन्नई सुपर किंग्सच्या महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर आहे.

विराट कोहली याची ऐतिहासिक कामगिरी

विराट कोहली याला या सामन्यात बॅटिंगने आपली छाप सोडण्यात अपयश आलं. विराट 19 बॉलमध्ये 1 चौकारासह 18 धावा केल्या. विराटला केएम आसिफ या नवख्या बॉलरने यशस्वी जयस्वाल याच्या हाती कॅच आऊट केलं.

राजस्थान रॉयल्स टीमला विजयासाठी 172 धावांचं आव्हान

दरम्यान आरसीबीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. आरसीबीने राजस्थान रॉयल्स टीमला विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं. आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेलिस आणि ग्लेम मॅक्सवेल या जोडीने अनुक्रमे सर्वाधिक 55 आणि 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. महिपाल लोमरुर 1 धाव करुन बाद झाला.

दिनेश कार्तिक भोपळाही फोडू शकला नाही. तर अखेरच्या काही षटकांमध्ये अनुज रावत याने काही फटके मारुन आरसीबीला 170 पार पोहचवलं. अनुज रावत याने 11 बॉलमध्ये 29 धावा केल्या. तर एम ब्रेसवेल याने नॉट आऊट 9 रन्स केल्या.

राजस्थानकडून केएम आसिफ आणि एडम झॅम्पा या जोडीने प्रत्येकी दोघांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर संदीप शर्मा याने 1 विकेट घेतली.

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.