जयपूर | सनरायजर्स हैदराबाद टीमने राजस्थान रॉयल्स संघावर 4 विकेट्सने सनसनाटी विजय मिळवला आहे.राजस्थानने सनराजर्स हैदराबादला विजयासाठी 215 धावांचं टार्गेट दिलं होतं. हे आव्हान हैदराबादने 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अब्दुल समद हा हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार ठरला. हैदराबादच्या फलंदाजांनी या 215 धावांचा शानदार पाठलाग करत सामना शेवटच्या बॉलपर्यंत आणून ठेवला.
राजस्थानकडून संदीप शर्मा याने शेवटच्या 20 ओव्हरमधील 5 बॉल हुशारीने टाकले. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी 1 बॉलमध्ये 5 धावांची गरज होती. स्ट्राईक एंडवर अब्दुल समद होता. संदीपने टाकलेल्या बॉलवर अब्दुलने फटका मारला. मात्र तो कॅच पकडला आणि राजस्थानचा 5 धावांनी विजय झाला. मात्र इथेच राजस्थानचे ग्रह फिरले. या शेवटच्या बॉलवर समद आऊट झाला, तो नो बॉल ठरला. संदीप शर्मा याचा पाय रेषेबाहेर होता.
ABDUL SAMAD – Take A Bow Man..!! ❤
That No ball change everything for RR. ?#RRvsSRH#AbdulSamad #SanjuSamsonpic.twitter.com/77A1Dwwy5D
— VK18Forever (Fan Page) (@VKianForever) May 7, 2023
त्यामुळे हैदराबादला आता विजयासाठी 4 धावांची गरज होती. आता मात्र समदने या संधीचा फायदा घेत कडकडीत सिक्स ठोकत हैदराबादला विजय मिळवून दिला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. हैदराबादचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. तसेच हैदराबादने राजस्थानवर मात करत मागील पराभवाचा वचपा घेतला. या दोन्ही संघांमध्ये 2 एप्रिल रोजी सामना पार पडला. तेव्हा राजस्थानने हैदराबादला 72 धावांनी पराभूत केलं होतं.
हैदराबादच्या प्रत्येक फलंदाजाने टीमच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. हैदराबादच्या फलंदाजांनी केलेल्या मेहनतीचं अब्दुल समद याने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून विजय मिळून दिल्याने तो हिरो ठरला. मात्र मेहनत सर्वांचीच होती. हैदराबादकडून अभिषेक शर्मा याने सर्वाधिक 55 रन्स केल्या. राहुल त्रिपाठी 47 धावांवर बाद झाला. अनमोलप्रीत सिंह याने 33 धावा जोडल्या. हेनरिच क्लासेन याने 26 आणिग्लेन फिलिप्स याने 25 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन एडन मार्करम 6 धावाच करु शकला. अब्दुल समद याने 7 बॉलमध्ये नाबाद 17 धावा केल्या. तर मार्को जान्सेन 3 धावांवर नॉट आऊट परतला. राजस्थानकडून युजवेंद्र चहल याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव आणि आर अश्विन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकला. कॅप्टन संजू सॅमसन याने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. जॉस बटलर आणि संजू सॅमसन या दोघांनी केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 215 धावांचं मजबूत टार्गेट दिलंय. राजस्थानकडून जॉस बटलर याने सर्वाधिक 95 धावांची खेळी केली. बटलरने 59 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 10 चौकारांच्या मदतीने या धावा केल्या.
संजू सॅमसनने 38 बॉलमध्ये 4 चौकार आणिन 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 66 रन्स केल्या. यशस्वी जयस्वाल याने 18 बॉलमध्ये 5 कडक फोर आणि 2 गगनचुंबी सिक्सच्या मदतीने वेगवान 35 धावा केल्या. तर शिमरॉन हेटमायर याने नाबाद 7 धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मार्को जान्सेन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, मुरुगन अश्विन, संदीप शर्मा, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, मार्को जॅनसेन, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.