मुंबई : आयपीएलमध्ये चमकदार कामगिरीनंतर शुबमन गिल त्याच्या लव्ह लाईफमुळे चांगलाच चर्चेत आहे. काही महिन्यांपासून शुबमन गिलचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडलं जात आहे. त्यानंतर अभिनेत्री आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खानशीही जोडलं जातय. सारा अली खानला आणि शुबमन गिल बर्याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्या दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू होत्या. पण काही दिवसांपूर्वीच सारा आणि शुबमनने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्यामुळे त्या दोघांच्या डेटींगच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अशातच आता शुबमनने त्याच्या क्रशबाबत सांगितलं आहे.
एका मुलाखतीत शुबमनने सारा अली खानला डेट करत नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्याचं नाव एका सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. ही अभिनेत्री शुभमनची क्रश असल्याचं त्यानं स्वतः सांगितलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आहे. रश्मिकाचा चाहता वर्ग लाखांहून अधिक आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. विशेष म्हणजे रश्मिका फक्त शुबमनचीच नाही तर सर्वांचीच क्रश आहे.
एका मुलाखतीत शुुमन गिलला त्याच्या क्रशबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्या चेहर्यावर एक गोड अशी स्माईल आली होती. त्यावेळी तो सांगायचं टाळतही होता, पण नंतर त्यानं सांगितलं की त्याची क्रश साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे. त्यामुळे आता यावर रश्मिका मंदानाची नेमकी काय रिऍक्शन असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.