मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत करो या मरोच्या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी केली. सनराईजर्स हैदराबादने फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान आरसीबीने 19.2 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं. तसेच 14 गुणांसह चांगल्या रनरेटसह गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं आहे. आता आरसीबीला आणखी एक संधी असून प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. आरसीबीच्या या विजयात विराट कोहलीचं शतक कामी आलं. विराट कोहलीने 63 चेंडूत 100 धावा केल्या. या खेळीत 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.
आरसीबीसाठी प्लेऑफच्या दृष्टीकोनातून हा सामना खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे आरसीबीच्या चाहत्यांना विराट कोहलीकडून अपेक्षा होत्या. महत्त्वपूर्ण सामन्यात विराटने चांगली बॅटिंग केली. शतकी खेळीमुळे आरसीबीचा विजय सोपा झाला. तसेच चांगल्या रनरेटमुळे चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. या विजयी जल्लोषात विराट कोहलीला एका खास व्यक्तीला फोन केला. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अनुष्का शर्मा होती.
#ViratKohli? #Anuskhasharma@imVkohli @AnushkaSharma @RCB #RCB ?✌️❣️?️ pic.twitter.com/WOzrlr0kZG
— The Hunter ? Ustaad RAPO (@RampothineniDHR) May 18, 2023
Virat on video call with anushka sharma after his 100 smiling like anythingg!!! #SRHvRCB#srhvsrcb pic.twitter.com/NXpif7fhEC
— gαנαℓ (@Gajal_Dalmia) May 18, 2023
अनुष्का शर्माचा फोन केल्यानंतर तिने कॉल उचलला आणि विराटचा आनंद गगनात मावेनासा झाला. भर मैदानात त्याने अनुष्काचा फोन बोलत आनंद व्यक्त केला. यावेळी क्षणचित्र कॅमेऱ्यात चित्रित केली गेली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज