लखनऊ | आयपीएल 16 व्या मोसमातील 47 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात केकेआरने पहिल टॉस जिंकून 9 विकेट्स गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. केकेआरकडून रिंकू सिंह याने सर्वाधिक 46 धावा केल्या. रिंकूच्या या खेळीने केकेआरचा डाव सावरला. रिंकूने 35 बॉलमध्ये 46 धावांच्या खेळीत 4 चौकार आणि 1 कडक सिक्स ठोकला.
केकेआरकडून रिंकू व्यतिरिक्त कॅप्टन नितीश राणा याने 42 धावांचं योगदान दिलं. आंद्रे रसेल याने 24 धावा केल्या. जेसन रॉय 20 धावा करुन माघारी परतला. अनुकूल रॉय याने नॉट आऊट 13 आणि वैभव अरोरा याने नाबाद 2 धावा केल्या.दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तिघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. हैदराबादकडून टी नटराजन आणि मार्को जान्सेन या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, कॅप्टन एडन मार्करम आणि मयांक मार्कंडे या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
रिंकूचा तडाखा
R for ?????. R for ??????????. ? pic.twitter.com/rlXklZSzPl
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 4, 2023
हे दोन्ही संघ पॉइंट्सटेबलमध्ये अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत. केकेआर ने या सिजनमध्ये 9 पैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळवलाय. तर हैदराबादला 8 पैकी 3 मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करता आलंय. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असा आहे. यामुळे हा सामना जिंकून कोणती टीम बाजी मारणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आयपीएल मध्ये आतापर्यंत सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स एकूण 24 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये केकेआरचा वरचष्मा आहे. केकेआरने 15 वेळा बाजी मारली आहे. तर हैदराबादला 9 वेळा विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आता हैदराबाद हा सामना जिंकून केकेआर विरुद्ध 10 वा विजय साजरा करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, आर गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, आर सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, एच राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (wk), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, कार्तिक त्यागी आणि टी नटराजन.