मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना होत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. गुतालिकेत लखनऊचा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर हैदराबादचा संघ नवव्या स्थानावर आहे. पण हैदराबादचे एकूण चार सामने खेळायचे आहेत. त्यामुळे त्यांनाही प्लेऑफची संधी आहे. असा हा महत्त्वपूर्ण सामना सुरु असताना पहिल्या इनिंगच्या 19 व्या षटकात गालबोट लागलं. इतकंच काय तर पंचांना हा सामना काही मिनिटांसाठी थांबवावा लागला. पोलिसांनाही यावेळी प्रेक्षक गॅलरीत यावं लागलं. पण नेमकं काय झालं याबाबत कोणालाच कल्पना नाही.
हैदराबादचा फलंदाज क्लासेन आक्रमक फलंदाजी करत असताना नो बॉलवरून पंचांशी थोडासा वाद झाला. पंचांनी नो बॉल दिल्यानंतर लखनऊने रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांनी नो नसल्याचं सांगितलं. त्यामुळे हैदराबादचे चाहते भडकले. इतकंच काय चाहत्यांनी कोहली कोहलीच्या घोषणा दिल्या. लखनऊ सुपर जायंट्सचे खेळाडू मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांमधून कोहली कोहलीचा जयघोष सुरु होता. तसेच खेळाडूवर काहीतरी फेकल्याचं समालोचक सांगत होते. मात्र यात किती तथ्य हे अद्याप स्पष्ट नाही.
गोंधळ पाहून पंचांनी पुढे येत हा सामना काही काळासाठी थांबवला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी एन्ट्री घेतली. त्यानंतर काही मिनिटांनी सामना पुन्हा सुरु करण्यात आला. या प्रकरणाचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लखनऊचे नवीन उल हक, गौतम गंभीर आणि विराट कोहलीचा वाद सर्वश्रूत आहे. त्यात आजच्या सामन्यातही नवीन उल हकला आराम देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला या वादाची किनार असावी असं सोशल मीडियावर बोललं जात आहे.
KOHLI KOHLI chants by Hyderabad crowd ❤️?❤️?❤️?
Baap of world Cricket @imVkohli ?#ViratKohli #SRHvsLSG
— Hail Virat Kohli ? (@HailViratKohli) May 13, 2023
Kohli Kohli CHANTS in Hyderabad#SRHvsLSGpic.twitter.com/DrSPxScJ55
— Gaurav (@Melbourne__82) May 13, 2023
सनराईजर्स हैदराबादने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. यासह हैदराबादने 20 षटकात 6 गडी गमवून 182 धावा केल्या. तसेच लखनऊसमोर विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हेन्रीच क्लासेन आणि अनमोलप्रीत सिंह यांनी चांगली फलंदाजी केली.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, कृणाल पांड्या (कर्णधार), प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक, आवेश खान
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी.