हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील 58 व्या सामन्यात अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा याचं रौद्र रुप क्रिकेट चाहच्यांना पाहायला मिळालं. लखनऊ सुपर जायंट्स टीमच्या अनुभवी अमित मिश्रा याने सनरायजर्स हैदराबाद टीमच्या अनमोलप्रीत सिंह याला आपल्याच बॉलवर आऊट केलं. त्यानंतर अमितने अनमोलला डोळे दाखवले. अमित इतक्यावरच थांबला नाही. अमितने यानंतर थेट रागाच्या भरात बॉल जमिनीवर आपटला. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नक्की काय झांलं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
अमित मिश्रा हैदराबादच्या डावातील नववी ओव्हर टाकत होता. मिश्राने या ओव्हरमधील 5 व्या बॉलवर अनमोलप्रीतला आपल्याच बॉलिंगवर कॅच आऊट केलं. मिश्रा कॅच घेतल्यानंतर संतापलेला. मिश्रा जोरात ओरडला त्यानंतर जमिनीवर जोरात बॉल आपटला. त्यामुळे बॉल टप्पा घेत अनमोलप्रीतच्या दिशेने गेला. यामुळे अंपायर अमित मिश्रा याच्याकडे जाऊन काही तरी बोलले. अनमोलप्रीत आऊट झाल्यानंतर हेनरिक क्लासेन मैदानात आला. क्लासेन याने येताच मिश्राच्या बॉलिंगवर चौका ठोकला. त्यामुळे मिश्राने क्लासेनकढे रागाने पाहिलं.
अमित मिश्रा संतापला
Caught & bowled, with ease ?#TATAIPL | #SRHvLSG
Relive how @MishiAmit dismissed the well-set Anmolpreet Singh ?? pic.twitter.com/sBkz7VI9XM
— IndianPremierLeague (@IPL) May 13, 2023
दरम्यान त्याआधी सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला. कॅप्टन एडन मार्करम याने बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 182 धावा केल्या. हैदराबादकडून हेनरिच क्लासेन याने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. अब्दुल समद याने नाबाद 37 रन्सचं योगदान दिलं. अनमोलप्रीत सिंह याने 36 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. एडन मार्करम याने 28 रन्स जोडल्या. राहुल त्रिपाठीने 20 रन्स केल्या अभिषेक शर्मा याने 7 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. ग्लेन फिलिप्स याला भोपळाही फोडता आला नाही.
तर लखनऊ सुपर जायंट्सकडून कॅप्टन कृणाल पंड्या याने 2 विकेट्स घेतल्या. तर युद्धवीर सिंह, आवेश खान, यश ठाकूर आणि अमित मिश्रा या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कर्णधार), अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार आणि फजलहक फारुकी.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन | कृणाल पांड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), कायल मेयर्स, प्रेरक मांकड, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, अमित मिश्रा, यश ठाकूर, रवी बिश्नोई, युधवीर सिंग चरक आणि आवेश खान.