हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी ठरली आहे. मुंबईने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादचा त्यांच्याच घरात पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदाराबादला विजयासाठी 193 धावांचे आव्हान दिलं होतं. हैदराबादनेही आपल्या बाजूने या धावांच्या आसपास येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याआधीच मुबंईच्या गोलंदाजांनी हैदराबादला रोखलं. मुंबईने हैदराबादला 19.5 ओव्हरमध्ये 178 धावांवर ऑलआऊट केलं. मुंबईचा हा हॅटट्रिक विजय ठरला. हैदराबादकडून मयंक अग्रवाल याने सर्वाधिक 48 धावा केल्या. हेनिरिच क्लासेन याने 36, कॅप्टन एडन मार्करम याने 22, मार्को जान्सेन 13 आणि वॉशिंग्टन सुंदर याने 10 धावा केल्या. मुंबईच्या गोलंदाजांनी या व्यतिरिक्त एकाही बॅट्समनला दुहेरी आकडा गाठू दिला नाही.
मुंबईकडून जेसन बेहरनड्रॉफ, पियूष चावला आणि रिले मेरेडिथ या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. कॅमरुन ग्रीन आणि अर्जुन तेंडुलकर या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 192 धावा केल्या. मुंबईकडून कॅमरुन ग्रीन याने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी केली. इशान किशन याने 38 रन्सचं योगदान दिलं. टिळक वर्मा याने 17 बॉलमध्ये 2 फोर आणि सिक्सच्या मदतीने 37 रन्सची वादळी खेळी केली.
कॅप्टन रोहित शर्मा 28 धावा करुन मैदानाबाहेर पडल. टीम डेव्हिड याने 16 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 7 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. सूर्याचा अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजाना चांगली सुरुवात मिळाली. मात्र कॅमरुन ग्रीन याचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला मोठी खेळी साकारता आली नाही. हैदराबादकडून मार्को जान्सेन याने 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडम मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), राहूल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को जानसेन, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.