SRH vs PBKS | सनरायजर्स हैदराबादने ‘पंजाब एक्सप्रेस’ रोखली, 8 विकेट्सने शानदार विजय

| Updated on: Apr 10, 2023 | 12:36 AM

राहुल त्रिपाठी हा सनराजर्स हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरला. त्रिपाठीने 144 धावांचा पाठलाग करताना 74 धावांची नाबाद खेळी केली.

SRH vs PBKS | सनरायजर्स हैदराबादने पंजाब एक्सप्रेस रोखली, 8 विकेट्सने शानदार विजय
Follow us on

हैदराबाद | आयपीएलच्या 16 व्या मोसमात 9 एप्रिलला डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात रिंकू सिंह याने कोलकाता नाईट रायडर्सला गुजरात जायंट्स विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत विजयी केलं. तर दुसऱ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सची घोडदौड रोखत मोसमातील पहिला विजय मिळवला आहे. पंजाब किंग्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 144 धावांचं आव्हान दिलं होतं.हैदराबादने हे विजयी आव्हान 17.1 आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

सनरायजर्स हैजराबादचा मोसमातील पहिला विजय

हैदराबादकडून राहुल त्रिपाठी याने सर्वाधिक 74 धावांची नाबाद खेळी केली. राहुलने 38 बॉलमध्ये 74 धावांच्या खेळीत 3 सिक्स आणि 10 चौकार ठोकले. तर कॅप्टन एडन मार्करम याने 21 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने नॉट आऊट 37 रन्स केल्या. तर हॅरी ब्रूकने 13 आणि मयंक अग्रवाल याने 21 रन्सचं योगदान दिलं. तसेच पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि राहुल चहर या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पंजाबच्या 8 फलंदाजांपैकी तिघांना भोपळाही फोडता आला नाही. उर्वरित 5 जणांनी 4,4,1,1,1* अशा धावा केल्या. सॅम कर याने 22 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन शिखर धवन याने टीमची लाज राखली.

शिखर धवन याने हैदराबाद विरुद्ध 66 बॉलमध्ये 12 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने नाबाद 99 धावांची खेळी केली. धवन यासह आयपीएलच्या इतिहासात 99 धावांवर नाबाद राहणारा एकूण चौथा फलंदाज ठरला आहे. धवनने केलेल्या या खेळीमुळे पंजाबला हैदराबादसमोर सन्मानजनक लक्ष्य ठेवता आलं.

दरम्यान हैदराबादकडून मयंक मार्कंडे याने सर्वाधिक 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मार्को जानसेन आणि उमरान मलिक या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार याने 1 विकेट घेत इतर गोलंदाजांना चांगली साथ दिली.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, उमरान मलिक आणि टी नटराजन.

पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सॅम कुरन, नॅथन एलिस, मोहित राठी, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.