मुंंबई : सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात हेनरिक क्लासेनने दमदार शतक ठाकेलं आहे. 50 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं, 97 धावांवर असताना सिक्सर मारत शतकाला गवसणी घातली. शतक झाल्यावर 104 धावांवर असताना बोल्ड आऊट झाला. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. या शतकासह क्लासेन आयपीएलच्या 16 व्या मोसमात शतक करणारा सातवा फलंदाज तर हैदराबादकडून शतक करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. हॅरी ब्रूक, प्रभसिमरन सिंग, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल यांच्यानंतर क्लासेनचा या यादीमध्ये समावेश झाला आहे.
सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासाठी 187 धावांचे लक्ष्य दिले होते. यादरम्यान हेनरिक क्लासेनने स्फोटक खेळी केली. हैदराबादने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. बेंगळुरूकडून ब्रेसवेलने सर्वाधिक 2 तर सिराज, शाहबाज आणि हर्षल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हैदराबादकडून याआधी डेव्हिड वॉर्नर याने 2017 साली 126, जॉनी बेअस्टो 2019 साली 114, हॅरी ब्रूकने यंदाच्या मोसमातच शतक केलं होतं. तर आज क्लासेन याने धमाकेदार खेळी करत पहिल्यांदा आयपीएलमध्ये खेळताना शतकाला गवसणी घातली आहे.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज