मुंबई : सनराईजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सुरू असलेल्या सामन्यात किंग विराट कोहलीचं वादळ आलेलं पाहायला मिळत आहे. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी 150 धावांची भागीदारी केली आहे. दोघांनीही हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना तोडफोड बॅटींग केली आहे. विराट कोहलीने पहिल्या बॉलपासूनचस विराटने हल्ला चढवत आपले मनसुबे दाखवले. दोघांनीही अर्धशतके केली असून मैदानावर आहेत.
विराट कोहली याने या खेळीमध्ये एक गगनचुंबी षटकार मारला आहे. कोहलीने आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या नितीश रेड्डीच्या दुसऱ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर 103 मीटरचा कडक सिक्स मारला आहे. या सिक्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे.
सनराइजर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना 187 धावांचं लक्ष्य आरसीबीला दिलं होतं. यामध्ये हेनरिक क्लासेन याने 104 धावांची सर्वाधिक शतकी खेळी केली. आरसीबीकडून ब्रेसवेलने सर्वाधिक 2 तर सिराज, शाहबाज आणि हर्षल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आरसीबीकडून लक्ष्य़ाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांनी 172 धावांची सलामी दिली. यामध्ये विराट कोहलीने 100 धावा तर फाफ ने 72 धावा केल्या. त्यानंतर मॅक्सवेल आणि ब्रेसवेल यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
पाहा व्हिडीओ-
Faf’s reaction sums it all up! ?
What a shot by King Kohli ?#ViratKohli #RCB #SRHvsRCB pic.twitter.com/XUir5KwOke
— OneCricket (@OneCricketApp) May 18, 2023
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज