हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमात गुरुवारी 18 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगला. आरसीबीने या सामन्यात हैदराबादवर एकतर्फी विजय मिळवत प्लेऑफमधील आव्हान कायम राखलं. हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 186 धावांचं आव्हान आरसीबीने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 19.2 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. विराट कोहली हा आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला. विराट याने आरसीबीकडून हैदराबाद विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. विराटने शतक ठोकत अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत.
विराटने खणखणीत शतक ठोकलं. विराटने 63 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 12 फोरच्या मदतीने 100 धावांची शतकी खेळी केली. विराटचं हे या मोसमातील पहिलं आणि आयपीएल कारकीर्दीतील एकूण सहावं शतक ठरलं. विराटने यासह ख्रिस गेल याच्या विक्रमाची बरोबरी केली. ख्रिस गेल यानेही आयपीएलमध्ये 6 शतकं ठोकण्याचा कारनामा केलाय.
विराटच्या एकूण टी 20 कारकीर्दीतील हे 7 वं शतक ठरलंय. विराटने यासह रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांना मागे टाकलंय. विराट आणि केएल या दोघांच्या नावावर प्रत्येकी 6 शतकांची नोंद आहे.
विराट कोहली याने आयपीएल इतिहासात 7 हजार 500 धावांचा टप्पा गाठला. विराट आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. विराटने एका शतकासह असे अनेक विक्रम आपल्या नावावर केले. आरसीबीसाठी हैदराबाद विरुद्धचा सामना प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा होता. या मस्ट विन सामन्यात विराट कोहलीने आपला धमाका दाखवत आरसीबीला विजय मिळवून दिला.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्करम (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार आणि नितीश रेड्डी.