Virat Kohli : विराट कोहलीने वादळी शतकासह आयपीएलमध्ये रचला इतिहास

| Updated on: May 21, 2023 | 10:40 PM

आयपीएलच्या 16 व्या मोसमात शतक करणारा आठवा फलंदाज ठरला आहे. या पर्वामध्ये विराटने पहिलं शतक ठोकलं आहे.

Virat Kohli : विराट कोहलीने वादळी शतकासह आयपीएलमध्ये रचला इतिहास
Follow us on

मुंबई : सनराइजर्स हैदराबादने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना किंग विराट कोहलीने धमाकेदार शतकी खेळी केली आहे. 62 चेंडूंमध्ये विराट कोहलीने सिक्सर मारत आपलं शतक पूर्ण केलं आहे. या 100 धावांच्या खेळीमध्ये त्याने खणखणीत 12 चौकार आणि 4 षटकार मारले. या पर्वामध्ये विराटने आप पहिलं आणि आयपीएलमधील आपलं सहावं शतक पूर्ण केलं.

आयपीएलच्या 16 व्या मोसमात शतक करणारा आठवा फलंदाज ठरला आहे. हॅरी ब्रूक, प्रभसिमरन सिंग, वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, शुबमन गिल, हेनरिक क्लासेन यांच्यानंतर विराटचा या यादीमध्ये समावेश झाला आहे. 2019  नंतर विराट कोहली याने आयपीएलमध्ये शतक केलं आहे.

विराट कोहली याने लक्ष्याचा पाठलाग करताना सामन्याच्या पहिल्या बॉलवर चौकार ठोकला होता. विराट कोहली आणि फाफ यांनी हैदरबादच्या खेळाडूंना सामन्यामध्ये कमबॅक करण्याची कोणतीही संधी दिली नाही.

दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 172 धावांची सलामी दिली, यंदाच्या पर्वातील विराट आणि फाफची विक्रमी भागीदारी आहे. आयपीएलमधील विराटचे हे सहावे शतक आहे. 2016 च्या मोसमातच त्याने 4 शतके झळकावली आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत त्याने ख्रिस गेलची बरोबरी केली आहे.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, अनुज रावत (W), शाहबाज अहमद, मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, हर्षल पटेल, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज