मुंबई : राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलमधील पहिला सामना मोठ्या दिमाखात जिंकला आहे. सनराइजर्स हैदराबाद संघाचा 72 धावांनी पराभव करत स्पर्धेतील विजयाचं खातं उघडलं आहे. आजच्या सामन्यामध्ये यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि संजू सॅमसन यांनी अर्धशतकी खेळी केली त्यामुळे राजस्थानने 203 धावांंचं लक्ष्य हैदराबादला दिलं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला 131 धावांपर्यंतच मजल मारता आली. एवढ्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना सुरूवात चांगली होणं हे गरजेचं होतं मात्र राजस्थानच्या स्ट्राईक बॉलरने त्यांच्या मनसूब्यांवर पाणी फेरलं.
ट्रेंड बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये सलामीला आलेल्या युवा अभिषेक शर्माला बोल्ड आऊट केलं. एकदम कडक यॉर्कर बॉलवर बोल्टने अभिषेक शर्माला आपली बळी बनवलं. पहिलाच मोठा धक्का असा बसल्याने त्यानंतर राहुल त्रिपाठी मैदानात उतरला होता. राहुलकडून हैदराबादला खूप अपेक्षा होत्या मात्र तोसुद्धा बोल्टचा बळी ठरला. राहुल पुढे आला बोल्टने परत एक चतुर गोलंदाजासारखा बॉल टाकला आणि राहुलला स्लिपला उभ्या असलेल्या होल्डरकडे कॅच द्यायला भाग पाडलं.
पाहा व्हिडीओ-
⚡️⚡️ Trent-ing in Hyderabad!pic.twitter.com/FVa7owLQnL
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 2, 2023
दोन्ही विकेटनंतर हैदराबादच्या संघाला मोठी भागीदारी करता आली नाही. ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या आणि संघाचा डाव 131 धावांवरच आटोपला. राजस्थानकडून चहलने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याआधी यशस्वी जयस्वाल 54, जोस बटलर 54 आणि संजू सॅमसन यांनी 55 धावा केल्या. आजच्या सामन्यात विजय मिळवत राजस्थान संघाने गुणांचं खातं उघडलं आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), जॉस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ आणि युजवेंद्र चहल.
हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | भुवनेश्वर कुमार (कर्णधार), मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, फजलहक फारुकी, टी नटराजन, उमरान मलिक आणि आदिल रशीद.