मुंबई : आयपीएलमधील चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सुरू आहे. पहिल्याच सामन्यामध्ये राजस्थान संघाने प्रथम फलंदाजी करताना तोडफोड बॅटींग केली आहे. राजस्थान संघाचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जॉस बटलर यांनी हैदराबादच्या बॉलर्सना चांगलंच फोडलंं. दोघेही फोडत राहिले आणि इतिहास रचून गेले आहेत. यंदाच्या सीझनमध्ये राजस्थानने पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावत 85 धावा काढल्या आहेत. यामध्ये जोस बटलरने 22 धावांमध्ये 54 धावा केल्या तर यशस्वी जयस्वालने 30 धावा केल्या.
दोघांनी सलामीला येत राजस्थानसाठी आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा काढल्या आहेत. 85 धावा काढत बटलर आणि जयस्वालने ही कामगिरी केली आहे. याआधी 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध 81 धावा केल्या होत्या. 2008 मध्ये पॉवर प्लेमध्ये डेक्कन चार्जसविरूद्ध नाबाद 78 धावा केल्या होत्या.
The Royals hit 13 fours and 3 sixes in powerplay ? https://t.co/drMxM9IxFB | #SRHvRR | #IPL2023 pic.twitter.com/GqdtOwodTb
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 2, 2023
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), उमरान मलिक, आदिल रशीद, भुवनेश्वर कुमार (c), टी नटराजन, फजलहक फारुकी