Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव याच्या शतकानंतर विराट कोहलीची मराठीमध्ये पोस्ट, म्हणाला…

| Updated on: May 12, 2023 | 10:46 PM

Virat Kohli Post for Suryakumar Yadav : सोशल मीडियावर सूर्यासाठी अनेकांनी पोस्ट करत त्याच्या या खेळीचं कौतुक केलं आहे. अशातच स्टार खेळाडू विराट कोहली याने केलेली पोस्ट तुफान व्हायरल होत असलेली पाहायला मिळत आहे.

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव याच्या शतकानंतर विराट कोहलीची मराठीमध्ये पोस्ट, म्हणाला...
Follow us on

मुंबई : मुंबई इंडिअन्स संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने शतकी खेळी केली आहे. सूर्याने आपल्या करिअरमधील पहिलं शतक करत इतिहास रचला आहे. सूर्याने गुजरात टायटन्सविरूद्ध ठोकलेल्या शतकानंतर त्याचं आजी-माजी खेळाडू त्याचं अभिनंदन आणि कौतुक करत आहे. सोशल मीडियावर सूर्यासाठी अनेकांनी पोस्ट करत त्याच्या या खेळीचं कौतुक करत आहेत. अशातच स्टार खेळाडू विराट कोहली याने सूर्यासाठी केलेली पोस्ट तुफान व्हायरल होत असलेली पाहायला मिळत आहे.

सूर्यकमार यादव याने 49 चेंडूत नाबाद 103 खेळी केली, शेवटच्या चेंडूवर त्याने सिक्सर मारत पहिल्या शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये तुला मानलं भाऊ, असं म्हणत सूर्याचा एक फोटो शेअर केला आहे.

 

सूर्यकमार यादवने आपल्या 103 धावांच्या खेळीमध्ये खणखणीत 11 चौकार आणि 6 षटकार मारले. वानखेडे मैदानावर सूर्याने चौफेर फलंदाजी करत गुजरात संघाच्या बॉलर्सना फोडून काढलं. सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्ससाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या म्हणजे हायस्कोअर करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

मुंबईकडून सनथ जयसूर्या याने 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 48 बॉलमध्ये नाबाद 114 धावा केल्या होत्या. रोहित शर्मा याने 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध नॉट आऊट 109 रन्स केल्या. तर आता सूर्याने 49 बॉलमध्ये नाबाद 103 धावांची शतकी खेळी केली.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (W), रोहित शर्मा (C), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय