मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील शेवटच्या टप्प्यातील काही सामने शिल्लक राहिले आहेत. या प्लेऑफच्या शर्यतीत एकूण 3 जागांसाठी 7 संघ आहेत. दिल्ली कॅपिट्ल्स आणि सनरायजर्स हैदराबाद याचं आव्हान संपुष्ठात आलं आहे. तर गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे या प्लेऑफच्या लढाईत लखनऊ सुपर जायंट्स, चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स आहेत. आता या 7 पैकी प्लेऑफसाठी कोणते 3 संघ पात्र ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र त्याआधी टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
या घटनेमुळे फक्त विराटलाच नाही, तर त्याच्या चाहत्यांनाही झटका लागला आहे. कुणीही विचारही केला नसेल की विराटसोबत असं काही होऊ शकेल. विराट कोहली याला मोठं नुकसान झालं आहे. विराटला आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नुकसान झालं आहे. विराटला वनडे रँकिंगच्या पहिल्या 10 फलंदाजांमधून बाहेर पडण्याचा धोका आहे.
आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. त्यानुसार, विराट कोहली याची घसरण झाली आहे. विराट थेट आठव्या स्थानी घसरलाय. विराट 719 रेटिंग पॉइंट्ससह 8 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विराट येत्या काळात टॉप 10 मधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
विराटला आयर्लंडच्या हॅरी टेकटर याने पछाडलं. हॅरीने सातव्या क्रमांकावर उडी घेतलीय. या वनडे रँकिंगमध्ये टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याने आपलं पाचवं स्थान कायम राखलंय. तर रोहित शर्मा 10 व्या क्रमांकावर आहे. तर अव्वल स्थानी पाकिस्तानचा बाबर आझम कायम आहे. टी 20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव याने आपला दबदबा कायम ठेवला आहे. सूर्यकुमारला आपलं पहिला क्रमांक कायम ठेवण्यात यश आलं आहे. टी 20 रँकिंगच्या पहिल्या 10 फलंदाजांमध्ये टीम इंडियाचा सूर्यकुमार हा एकमेव भारतीय आहे.
विराट कोहली याला झटका
Harry Tector has achieved the highest rating by an Ireland batter in the latest @MRFWorldwide ICC Men’s ODI Player Rankings for Batting ?
Details ➡️ https://t.co/9xdbhCIxdK pic.twitter.com/uifF9a0aau
— ICC (@ICC) May 17, 2023
दरम्यान आयपीएलनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध लंडनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना लंडनमधील द केनिंग्टन ओव्हल या मैदानात पार पडणार आहे. टीम इंडियाची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळण्याची दुसरी वेळ आहे. याआधी टीम इंडिया 2021 मध्ये विराट कोहली याच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळली होती. तेव्हा भारताला पराभूत व्हावं लागलं होतं.
आता टीम इंडिया रोहित शर्मा याच्या कॅप्टन्सीत खेळणार आहे. त्यामुळे विराटला जे आपल्या नेतृत्वात जमलं नाही, ते रोहित करुन दाखवणार काय, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.