मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेत आता गुणांसाठी सर्वच संघांमध्ये चढाओढ निर्माण झाली आहे. पहिल्या स्थानावर पोहोचण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्नशील आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ सोडला तर सर्वच या शर्यतीत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक विजय आणि पराभव गुणतालिकेचं गणित बिघडवत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर 24 धावांनी विजय मिळवला. या विजयासह खात्यात सहा गुणांची कमाई झाली. तसेच पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे या सामन्याचं नेतृत्व विराट कोहलीने केलं. त्यामुळे सामना जिंकल्यानंतर त्याने गुणतालिकेबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
“गुणतालिका तुमच्या संघाचं अस्तित्व परिभाषित करू शकत नाही. आम्ही आताशी पाच ते सहा सामने खेळलो आहोत. आम्ही साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यापर्यंत प्रयत्नशील असू. त्यामुळे आम्हाला काय अपेक्षित आहे यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. फाफने चांगली फलंदाजी केली. तर गोलंदाजांनी त्यांना रोखलं हे विशेष बाब आहे. कारण गोलंदाजांना लक्ष्य पुरेसं असल्याचं सांगितलं होतं. पॉवर प्लेमध्ये चार विकेट्स घेतल्यानंतर दबाव वाढला होता आणि सामना आमच्या बाजून झुकला.”, असं विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितलं.
विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस या जोडीने संघाला सावध सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 137 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने 47 चेंडूत 59 धावांची खेळी केली, तर फाफने 56 चेंडूत 84 धावा केल्या. बंगळुरूने 20 षटकात 4 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं.
विजयी धावांचा पाठलाग करताना पंजाबने सुरुवातील झटपट विकेट्स गमावल्या. प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा सोडलं तर एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. संपूर्ण 18.2 षटकात 150 धावांवर बाद झाला. बंगळुरुने पंजाबवर 24 धावांनी मात मिळवली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (कर्णधार), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, सुयश प्रभुदेसाई, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अथर्व तायडे, मॅथ्यू शॉर्ट, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग