मुंबई : आयपील 2023 स्पर्धेतील प्रत्येक सामना आता महत्त्वाचा आहे. कारण शेवटच्या टप्प्यातील सामने प्लेऑफचं गणित ठरवणार आहेत. त्यामुळे खेळाडूंची प्रत्येक सामन्यावर करडी नजर आहे. असंच काहीसं विराट कोहलीचं देखील आहे. कारण प्लेऑफचं गणित टॉपला असलेल्या संघामुळे बदलू शकतं. गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या टॉपला असलेल्या संघामध्ये सामना रंगला. हा सामना गुजरातने 56 धावांनी जिंकला. त्यामुळे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानवर असलेल्या संघांना एक संधी आणखी मिळणार आहे.
दुसरीकडे, विराट कोहलीने गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याचे इंस्टाग्राम स्टेटस ठेवण्याचं कारण काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. या इंस्टाग्राम स्टेटसचा वेगळाच अर्थ नेटकरी लावत आहे. असं स्टेटस ठेवत गौतम गंभीरला डिवचत असल्याचं सांगितलं जात आहे. या सामन्यातील वृद्धिमान साहा फलंदाजी आणि राशीद खानचा झेल असे दोन स्टेटस त्याने ठेवले आहेत.
Wonder why Virat Kohli is watching this Gujarat Titans VS Lucknow Super Giants game so closely ?#GTvLSG #ViratKohli? pic.twitter.com/TUhM4h2ywK
— Sushant Mehta (@SushantNMehta) May 7, 2023
या स्टेटसच्या माध्यमातून विराट कोहलीने गौतम गंभीरला डिवल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. कारण लखनऊ विरुद्ध बंगळुरु सामन्यात विराट आणि गंभीरचं भांडण संपूर्ण जगाने पाहिलं आहे. त्यामुळे हे स्टेटस त्याच भांडणाचा एक भाग असल्याचा अंदाज नेटकरी बांधत आहे.
Virat Kohli latest Instagram story after Gujarat Titans beats Lucknow Supergiants.#GTvsLSG pic.twitter.com/30dLZk9vAy
— Akshat (@AkshatOM10) May 7, 2023
Virat Kohli's recent Instagram story pic.twitter.com/XfX9Fh3B7m
— SUPRVIRAT (@ishantraj51) May 7, 2023
Last story of Virat Kohli' Instagram pic.twitter.com/QmYIYXJNXA
— Desi Bhayo (@desi_bhayo88) May 7, 2023
मोठ्या विजयामुळे गुजरातचं प्लेऑफमधलं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. दुसरीकडे लखनऊच्या पराभवामुळे बंगळुरु, मुंबई आणि पंजाबला आणखी एक संधी मिळणार आहे. सध्या गुणतालिकेत गुजरात 16 गुणांसह प्रथम स्थानी, चेन्नई 13 गुणांसह दुसऱ्या, लखनऊ 11 गुणांसह तिसऱ्या, राजस्थान 10 गुणंसह चौथ्या, बंगळुरु 10 गुणांसह पाचव्या, मुंबई 10 गुणांसह सहाव्या आणि पंजाब 10 गुणांसह सातव्या स्थानी आहे.
लखनऊ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), काइल मेयर्स, दीपक हुडा, कृणाल पांड्या (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, स्वप्नील सिंग, यश ठाकूर, रवी बिश्नोई, मोहसीन खान, आवेश खान.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी