मुंबई : क्रिकेटपटू शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. सारा तेंडुलकर आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. शुभमन गिलही आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून बरंच काही सांगून जातो. मात्र आयपीएलमधील गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यानंतर दोघांचे इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. या इन्स्टाग्राम स्टोरीमधून दोघांना नेमकं काय सांगायचं आहे? याचा अंदाज नेटकरी बांधत आहेत. गुजरात विरुद्ध बंगळुरु सामन्यापूर्वी सारा तेंडुलकरने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये दोन पोस्ट केल्या आहेत. त्यात सेल्फी पोझ देत हार्टशेप ब्लिंक होताना दिसत आहेत. तसेच त्यानंतर मुंबई जिंकल्याचं दाखवलं आहे. दुसरीकडे, शुभमन गिलने बंगळुरुला पराभूत केल्यानंतर वीज पडल्याचं दाखवत दोन निळ्या रंगाचे हार्टशेप शेअर केले आहेत. त्यामुळे त्या निळ्या रंगाच्या हार्टशेपचा संबंध मुंबई इंडियन्सशी जोडला जात आहे.
गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6 विकेट्स आणि 5 चेंडू राखून पराभूत केलं. यामुळे मुंबई इंडियन्सला थेट फायदा झाला असून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित झालं आहे. या विजयानंतर लगेचच शुभमन गिलने आपलं इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली आहे. त्यातील निळ्या रंगाचे हार्टशेप बरंच काही सांगून जात असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण मुंबई इंडियन्सचे फॅन कायम ब्लू हार्ट ठेवतात.
शुभमन गिलने 52 चेंडूत 8 षटकार आणि 5 चौकारांच्या जोरावर नाबाद 104 धावा केल्या. यामुळे गुजरातचा विजय सोपा झाला. तसेच मुंबईला प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अनेकदा सामना खेळताना प्रेक्षकांनी क्षेत्ररक्षण करणाऱ्या गिलला साराच्या नावावरून चिडवल्याचं पाहिलं गेलं आहे. त्याचबरोबर या दोघांच्या सोशल मीडिया हँडलवरही नेटकऱ्यांचं लक्ष असतं.
Shubman Gill = Loyalty ?? pic.twitter.com/M1FoswTORC
— Amit (@AmitMovieHolic) May 21, 2023
When Shubman Gill helps you qualify. #RCBvGT pic.twitter.com/oZ7WvIUxzq
— Sagar (@sagarcasm) May 21, 2023
#RCBvGT #ShubmanGill pic.twitter.com/LlTdTwHMdO
— Raghav Bajaj ?? (@raghav249) May 21, 2023
Sachin and Sara watching Shubman Gill's batting pic.twitter.com/7RmEEU4kRD
— ಭಲೇ ಬಸವ (@Basavachethanah) May 21, 2023
शुभमन गिल आणि सारा यांच्यात काहीतरी सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र याबाबत कोणीही अधिकृतरित्या काहीच बोललेलं नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वावड्या उठत आहेत. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर शुभमन गिलचे आभार मानल्याने नेटकरी वेगळाच संदर्भ जोडत आहे.
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स एलिमिनेटर किंवा अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 23 मे रोजी गुजरात विरुद्ध चेन्नई सामना आहे. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत जाईल. पराभूत झालेला संघ मुंबई आणि लखनऊ विजेत्या संघाशी भिडेल. त्यानंतर त्या संघाची अंतिम फेरीत वर्णी लागेल.