मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 199 धावा केल्या आहेत. सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर राजस्थानने 200 धावांचा टप्पा पार केला. यशस्वी आज मैदानावर उतरण्याआधीच सेट होऊन आला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने खलील अहमदला पाच चौकार मारले होते. राजस्थान रॉयल्सने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
पाहा व्हिडीओ-
1-2 ka 4, 4-2 ka bhi 4 – Yashaswi Jaiswal is dealing in boundaries only! #IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL | @rajasthanroyals pic.twitter.com/9EE0BmtnxB
— JioCinema (@JioCinema) April 8, 2023
पहिल्यापासूनच यशस्वीने आक्रमक पवित्रा घेतला होता. जोस बटलर दुसऱ्या एंडला होता मात्र त्याला स्ट्राईक मिळाली नाही. जयस्वालने दिल्लीची गोलंदाजी फोडून काढली कारण त्याने अवघ्या 25 चेंडूत 50 धाव केल्या. चौकार मारतच त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक मारल्यावर तो आणखी आक्रमक झालेला दिसला. एक गगनचुंबी षटकार मारला मात्र त्यानंतर त्यावा युवा खेळाडू मुकेश कुमारने त्याला आपल्या गोलंदाजीवर आऊट केलं.
पहिल्या विकेटसाठी दोघांनी 98 धावांची भागीदारी केली. पॉवर प्लेमध्ये दोघांनी फक्त चौकारांमध्येच धावा वसुल केल्या. यशस्वी जैसवालने आपल्या खेळीमध्ये तब्बल 11 चौकार आणि 1 षटकार मारले. दुसरीकडे जोस बटलरने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली.
बटलरने 79 धावांची खेळी केली त्यामध्ये त्यानेही 11 चौकार आणि 1 षटकार मारला होता. बटरल 21 धावांनी त्याच्या शतकापासून दूर राहिला.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेवन): डेविड वॉर्नर (W), मनीष पांडे, राइली रोसौ, रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), एनरिक नॉर्खिया, खलील अहमद, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेवन): जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सैमसन (C/W), रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप आणि युजवेंद्र चहल