IPL 2024 Auction | पहिलाच खेळाडू मालामाल, बेस प्राईजच्या सहापट रक्कम मिळाली

| Updated on: Dec 19, 2023 | 2:06 PM

IPL 2024 Auction in Marathi | आयपीएल 2024 च्या मोसमासाठीच्या लिलावात पहिलाच खेळाडूला चांगली रक्कम मिळाली आहे. त्या खेळाडूला बेस प्राईजच्या सहापट रक्कम मिळाली.

IPL 2024 Auction | पहिलाच खेळाडू मालामाल, बेस प्राईजच्या सहापट रक्कम मिळाली
Follow us on

दुबई | आयपीएल आगामी 17 व्या मोसमासाठी दुबईत ऑक्शन सुरु आहे. या ऑक्शनला दहा फ्रँचायजींचे मालक आणि इतर महत्त्वाचे खेळाडू ऑक्शन टेबलवर विराजमान आहेत. ऑक्शनच्या सुरुवातीला औपचारिक भाषण पार पडलं. त्यानंतर मुख्य ऑक्शनच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. संबंधित व्यक्तीने येऊन पहिल्या खेळाडूची चिठ्ठी काढली. हा पहिलाच खेळाडू चांगलाच भाग्यवान ठरला. या खेळाडूला त्याच्या बेस प्राईजच्या जवळपास सहापट रक्कम मिळाली. नक्की तो कोण आहेत, हे जाणून घेऊयात.

वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर रोवमॅन पॉवेल हा आयपीएल 17 व्या मोसमाच्या लिलावात विकला गेलेला पहिला फलंदाज ठरला. रोवमॅनची बेस प्राईज ही 1 कोटी रुपये इतकी होती. बेस प्राईज म्हणजे त्या रक्कमेपासून पुढे लिलावात बोली होते. त्यानुसार रोवमॅनला आपल्या ताफ्या घेण्यासाठी संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. 10 लाख, 20 लाख करता रोवमॅनची किंमत ही 5 कोटींच्या पार गेली. त्यानंतरही रोवमॅनसाठी चढाओढ पाहायला मिळाली.

या रस्सीखेचमध्ये अखेर पहिल्या मोसमातील विजेता संघ राजस्थान रॉयल्सला यश आलं. राजस्थान रॉयल्सने 1 कोटी असलेल्या रोवमॅन पॉवेल याला 7 कोटी 40 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. त्यामुळे रोवमॅनला निश्चितच त्याच्या अपेक्षेपेक्षा चांगलीच रक्कम मिळाली.

रोवमॅनसाठी 50 टक्के रक्कम खर्च

राजस्थानने एकट्या रोवमॅनसाठी 50 टक्के रक्कम खर्च केली. राजस्थानकडे लिलावासाठी एकूण 14 कोटी 50 लाख रक्कम होती. राजस्थानने या 14 कोटी 50 लाखपैकी एकट्या रोवमॅनवर 7 कोटी 40 लाख रुपये खर्च केले. त्यामुळे आता राजस्थानकडे 7 कोटी 10 लाख इतकी रक्कम बाकी आहे. राजस्थानला आणखी 7 खेळाडूंची गरज आहे. त्या 7 पैकी 2 विदेशी आणि 5 भारतीय खेळाडू राजस्थानला घ्यावे लागतील.

आयपीएल 2024 ऑक्शनची दणक्यात सुरुवात

एका बाजूला रोवमॅनला घसघशीत रक्कम मिळाली. तर दुसऱ्या बाजूला रायली रुसो हा कमनशिबी ठरला. रायली रुसो हा अनसोल्ड ठरला. रायली रुसोला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी कोणत्याही टीमने रस दाखवला नाही. रायलची बेस प्राईज ही 2 कोटी इतकी होती.

थोडक्यात पण महत्त्वाचं

प्रत्येक फ्रँचायजी आपल्या टीममध्ये जास्तीत जास्त 25 आणि कमीतकमी 18 खेळाडूंचा समावेश करु शकते. या आकड्याशिवाय कमी किंवा जास्त खेळाडू ठेवता येणार नाहीत.