क्रिकेटची कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्यामागे ग्राऊंड्समन आणि पिच क्युरेटर्स यांची मोठी भूमिका असते. आता आयपीएलचा 17 वा सीझन पार पडला असून केकेआर संघाने फायनल जिंकत तिसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरलं. ऊन, पाऊस आणि हवामानाचा सामना करत ते पिच चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पडद्यामागचे कलाकार म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. याच पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल संपल्यावर खेळाडूंवर जसा पैशांचा पाऊस पडला आहे. तसाच आता या मेहनती ग्राऊंड्समन आणि पिच क्युरेटर्ससाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठी घोषणा केली आहे.
आपली लीग यशस्वी होण्यामाग पडद्यामागचा खरा नायक ग्राऊंड स्टाफ आहे. ज्यांनी अगदी कठीण परिस्थितीमध्ये चांगले पिच होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. आयपीएलच्या 10 होम टीमच्या ग्राऊंड्समन आणि पिच क्यूरेटर यांनी प्रत्येकी 25 लाख आणि अतिरिक्त तीन ठिकाणांवरील प्रत्येकाला 10 लाख रूपये देण्यात येणार आहेत. तुम्ही घेतलेल्या मेहनतीसाठी तुमचे मनापासून धन्यवाद, असं जय शाह यांनी म्हटलं आहे.
The unsung heroes of our successful T20 season are the incredible ground staff who worked tirelessly to provide brilliant pitches, even in difficult weather conditions. As a token of our appreciation, the groundsmen and curators at the 10 regular IPL venues will receive INR 25…
— Jay Shah (@JayShah) May 27, 2024
आयपीएल सुरू असताना अनेकदा पावसाने खोडा घातला, काही सामने पावसामुळे रद्द करावे लागले. मात्र पाऊस पडून गेल्यावर सामना सुरू करण्यासाठी ग्राऊंड्सन आपली सर्व ताकद लावून काम करत होते. सामना चालू होण्यासाठी त्यांची धडपड सर्व जग पाहत होतं. सामना चालू झाल्यावर सगळे सामन्याचा आनंद घेण्यात गुंग होतात, पण घामाने ओले चिंब झालेल्या या ग्राऊंड्समनकडे कोणाची नजर जात नाही. पण बीसीसीयआयने त्यांच्या कष्टाची दखल घेतली.
दरम्यान, यंदाच्या आयपीएल सीझनचा फायनल सामना चेपॉक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यामध्ये केकेआर आणि हैदराबाद दोन संघ भिडले. संपूर्ण लीगमध्ये आपली एकहाती सत्ता असल्यासारखं बॅटींग प्रदर्शन करणारा हैदराबादचा संघ शेवटच्या सामन्यात मात्र ढेपाळलेला पाहायला मिळाला. 18.3 ओव्हरमध्ये 113 धावा केल्या होत्या. या छोट्या लक्षाचा पाठलाग करणाऱ्या केकेआरने अवघ्या दीड तासांच्या आतमध्ये सामना आठ विकेटने जिंकला. या सामन्यामध्ये सामनावीर म्हणून मिचेल स्टार्क याला गौरवण्यात आलं.