मुंबई : आयपीएल 2024 लिलाव पार पडला असून आता कोणता प्रत्येक फ्रंचायसींनी आपला संघ तगडा करण्यासाठी लिलावामध्ये पैसा ओतला आहे. केकेआरने मिचेल स्टार्कसाठी 24 कोटी 75 लाखांची बोली लावली. तर हैदराबाद संघाने पॅट कमिन्सवर 20 कोटी 50 लाखांची बोली लावली. प्रत्येक संघाने मजबूत पैसा ओतला सीएसकेने लिलावामध्ये संधीचं सोनं केलेलं पाहायला मिळाला. सीएसकने रैनाची जागा भरून काढणाऱ्या खेळाडूला आपल्या ताफ्यात सामील केलं.
सीएसकेने अनकॅप खेळाडू समीर रिझवी याला 8 कोटी 40 लाख रूपयांनी विकत घेतलं होतं. उत्तर प्रदेशकडून खेळणाऱ्या अवघ्या 20 वर्षांच्य समीर रिझवीसाठी तब्बल 8 कोटी सीएसकेने घालवले. आता झालेल्या यूपी लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला होता. समीरने 10 सामन्यांमध्ये 50.56 च्या सरासरीने आणि 188.8 च्या उत्कृष्ट स्ट्राइक रेटने 455 धावा केल्या होत्या.
सीएसकेचा भावी सुरेश रैना म्हणून समीरची गणना केली जात आहे. मिस्टर आयपीएल म्हणून सुरेश रैनाला ओळखलं जातं. समीरची रैनासोबत तुलना केल्यावर त्याने, जर लोक मला सुरेश रैना बोलत असतील तर रैनाने सीएसकेसाठी जे केलं तेच करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. रैनाची फिल्डिंग मला आवडते, तशाच प्रकारे मीसुद्धा माझं सर्वस्व देऊन खेळणार असल्याचं समीर रिझवान यांनी म्हटलं आहे.
एमएस धोनी (C), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद सिंग, मिचेल सिंग, शेख रशीद. , निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावेली.