मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 5 व्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध नाणेफेक जिंकली. मुंबई इंडियन्सचं पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत असलेल्या हार्दिक पंड्या याने आपल्या माजी सहकारी शुबमन गिल याच्या गुजरात टायटन्स टीम विरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. हार्दिकने यासह गुजरात टायटन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईला या पहिल्याच सामन्यात ज्याची भीती होती, तेचं घडलं. मुंबईचा स्टार बॅट्समन हुकमाचा सूर्यकुमार यादव हा या सामन्यातून बाहेर पडला आहे. सूर्यकुमार यादव अनफिट असल्याने त्याची प्लेईंग ईलेव्हनमध्ये निवड करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबईला मोठा धक्का लागला आहे.
सूर्यकुमार यादव याला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यात दुखापत झाली. सूर्या अनेक आठवड्यांनंतर दुखापतीतून बाहेर पडला. मात्र अखेरच्या टप्प्यात तो अपयशी ठरला. आपण फिट असल्याचं सिद्ध करण्यात सूर्या फेल झाला. सूर्या एनसीएमध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला. त्यामुळे सूर्यावर आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार असल्याचं जवळपास निश्चित झालं होतं. आता ते खरं ठरलंय. सूर्या नसल्याने मुंबईच्या चाहत्यांना त्याच्या बॅटिंगसाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता सूर्या कधीपर्यंत कमबॅक करतो, याकडे लक्ष असणार आहे.
दरम्यान मुंबईकर ऑलराउंडर शम्स मुलानी याने आयपीएलमध्ये पलटणकडून पदार्पण केलं आहे. शम्स मुलानी याने नुकत्याच पार पडलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईसाठी निर्णायक भूमिका बजावली. मुंबईने 42 व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकली. शम्स मुलानी याने 2023-2024 रणजी ट्रॉफी स्पर्धेत 35 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर 353 धावाही केल्या. शम्सकडून आता आयपीएलमध्ये अशीच कामगिरी अपेक्षित असणार आहे.
सूर्यकुमार यादव अजूनही अनफीट
𝗪𝗜𝗟𝗟 𝗠𝗜 𝗠𝗜𝗦𝗦 𝗦𝗨𝗥𝗬𝗔𝗞𝗨𝗠𝗔𝗥 𝗬𝗔𝗗𝗔𝗩?
Suryakumar Yadav is currently not available due to injury. pic.twitter.com/cSR0V2MgZ0
— Cricket.com (@weRcricket) March 24, 2024
गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.