आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 67 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध टॉस जिंकला. मुंबईने टॉस जिंकून लखनऊला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हार्दिक पंड्याची वानखेडे स्टेडियममध्ये या हंगामात टॉस जिंकण्याची ही सातवी वेळ ठरली. मुंबई आणि लखनऊ या दोन्ही संघांचा हा या हंगामातील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये अनेक बदल केले आहेत. कॅप्टन हार्दिक पंड्या याने प्लेईंग ईलेव्हनमध्ये अखेर अर्जुन तेंडुलकर याला संधी दिली आहे. तर रोहित शर्माला प्लेईंग ईलेव्हनमधून वगळून त्याचा इमपॅक्ट खेळाडूंमध्ये समावेश केला आहे.
अर्जुन तेंडुलकरला या हंगमातील पहिल्या 13 सामन्यांमध्ये बाहेरचं ठेवण्यात आलं. टीम मॅनेजमेंटने अर्जुनला अखेरच्या सामन्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये खेळवण्याचं ठरवलं. अर्जुनने आयपीएलमधील अखेरचा सामना हा 25 एप्रिल 2024 रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळला होता. अर्जुनने गेल्या हंगामातून आयपीएल पदार्पण केलं होतं. माजी कर्णधार रोहित शर्मा याने अर्जुनला एकूण 4 सामन्यात खेळण्याची संधी दिली होती. अर्जुनने त्या 4 सामन्यांमध्ये 13 धावा आणि 3 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
दरम्यान हार्दिक पंड्याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या साम्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकूण 3 बदल केले आहेत. अर्जुनसह डेवाल्ड ब्रेव्हिस आणि रोमरिया शेफर्ड या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. तर जसप्रीत बुमराह, टीम डेव्हिड आणि तिलक वर्मा या तिघांना विश्रांती देण्यात आली आहे. तर लखनऊ टीमधून क्विंटन डी कॉक याला बाहेर ठेवण्यात आलं आहे. तसेच देवदत्त पडीक्कल आणि मॅट हेन्री या दोघांची एन्ट्री झाली आहे.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, नेहल वढेरा, रोमॅरियो शेफर्ड, अंशुल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर आणि नुवान तुषारा.
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोयनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, अर्शद खान, मॅट हेन्री, रवी बिश्नोई आणि मोहसिन खान.
मुंबई इंडियन्स इम्पॅक्ट प्लेअर्स : रोहित शर्मा, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, आकाश मधवाल आणि कुमार कार्तिकेय.
लखनऊ सुपर जायंट्स इम्पॅक्ट प्लेअर्स : नवीन-उल-हक, ॲश्टन टर्नर, मणिमरन सिद्धार्थ, प्रेरक मंकड आणि कृष्णप्पा गौथम.