RCB vs CSK Confirmed Playing XI, IPL 2024 : चेन्नईकडून करो या मरो सामन्यात मोठा बदल, आरसीबीत घातक ऑलराऊंडरची एन्ट्री

| Updated on: May 18, 2024 | 7:39 PM

Royal Challengers Bengaluru vs Chennai Super Kings Confirmed Playing XI in Marathi: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांसाठी प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थिती जिंकावा लागणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी बदल केला आहे.

RCB vs CSK Confirmed Playing XI, IPL 2024 : चेन्नईकडून करो या मरो सामन्यात मोठा बदल, आरसीबीत घातक ऑलराऊंडरची एन्ट्री
virat ruturaj csk vs rcb ipl 2024
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 68 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील अखेरचा आणि करो या मरो असा सामना आहे. प्लेऑफसाठी उर्वरित एका जागेसाठी या दोन्ही संघांमध्ये चढाओढ आहे. चेन्नईला प्लेऑफमधील शेवटची जागा मिळवण्यासाठी फक्त जिंकायचं आहे. तर आरसीबीला फक्त जिंकून चालणार नाही. तर आरसीबीला नेट रनरेटच्या हिशोबाने थोड्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकावा लागणार आहे.

आरसीबी विरुद्ध सीएसके या सामन्याचं आयोजन हे एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. चेन्नईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने टॉस जिंकला. ऋतुराजने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेत आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आरसीबीने या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. विल जॅक्स याच्या जागी घातक ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल याचा समावेश केला आहे. तर चेन्नईने या सामन्यात मोठा बदल केला आहे. ऑलराउंडर मोईन अली निवडीसाठी उपलब्ध नसल्याने त्याच्या जागी मिचेल सँटनर याचा समावेश करण्यात आला आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान आरसीबी विरुद्ध चेन्नई दोन्ही संघ आयपीएल इतिहासात एकूण 31 सामन्यांमध्ये आमनेसामने खेळले आहेत. यामध्ये सीएसकेचा दबदबा राहिला आहे. सीएसकेने 31 पैकी 21 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीला 10 वेळा यश आलं आहे. तसेच या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. उभयसंघात या हंगामातील पहिला सामना 22 मार्च रोजी झाला होता. चेन्नईने तो सामना 6 विकेट्सने जिंकलो होता.

आरसीबी आणि चेन्नईची प्लेईंग ईलेव्हन

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, यश दयाल, लॉकी फर्ग्युसन आणि मोहम्मद सिराज.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग आणि महेश तीक्षना.