मुंबई | आयपीएल 2024 चं काउंटडाऊन सुरु झालं आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ‘कॅप्टन कूल’ अर्थात महेंद्रसिंह धोनी याच्या एका फेसबूक पोस्टमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. महेंद्रसिंह धोनीच्या या पोस्टमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तसेच धोनीच्या या पोस्टचे अनेक अर्थ काढले जात आहेत. धोनीची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. धोनीने या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलंय हे जाणन घेऊयात. धोनीने आतापर्यंत अनेक निर्णय हे तडकाफडकी घेत चाहत्यांना धक्का दिला आहे. कॅप्टन्सीबाबत असो किंवा निवृत्तीबाबत, धोनीने असे अनेक निर्णय झटपट घेतले आहेत. आता आयपीएलच्या आधी धोनीच्या या पोस्टचे अनेक अर्थ काढले जात आहेत. धोनीच्या या पोस्टवर अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
“नव्या हंगामासाठी आणि नव्या ‘भूमिका’साठी आता प्रतिक्षा करवत नाही. लागून रहा”,असं धोनीने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलंय. आता धोनी आयपीएलमध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार? तो क्रिकेट सोडून कोचिंग करणार की आणखी दुसरं काही करणार का? असे अनेक उलटसुलट अंदाज लावले जात आहेत. आता धोनी नक्की काय करणार आहे, हे पाहण्यासाठी चाहत्यांना वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या मोसमाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर न करता पहिल्या टप्प्याची घोषषा केली आहे. या पहिल्या टप्प्यात एकूण 17 दिवसांमध्ये 21 सामने पार पडणार आहेत. या पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघाचे किमान 3 आणि जास्तीत 5 सामने होणार आहेत. चेन्नई सुपर किंग्सचे 4 सामने होणार आहेत. त्यापैकी पहिले दोन्ही सामने घरच्या मैदानात पार पडतील. चेन्नईचे चारही सामने संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील.
महेंद्रसिंह धोनीची बहुचर्चित सोशल मीडिया पोस्ट
Facebook post of MS Dhoni.
– It’s time for the Thala show in IPL 2024. 🦁 pic.twitter.com/vM1HBtrKEa
— Johns. (@CricCrazyJohns) March 4, 2024
सीएसके विरुद्ध आरसीबी, 22 मार्च, चेन्नई
सीएसके विरुद्ध जीटी, 26 मार्च, चेन्नई
सीएसके विरुद्ध डीसी, 31 मार्च, विशाखापट्टणम
सीएसके विरुद्ध एसआरएच, 5 एप्रिल, हैदराबाद
आयपीएल 2024 साठी सीएसके टीम | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, मोईन अली, दीपक चाहर, डेव्हॉन कॉनव्हे (विकेटकीपर), तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश तीक्ष्णा, रचीन रवींद्र, शार्दूल ठाकुर, डॅरेल मिचेल, समीर रिजवी, मुस्तफिजूर रहमान आणि अरावेली अवनिश.