आयपीएलच्या 17 व्या मोसमाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडणार आहे. फाफ डु प्लेसीस आरसीबीचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर या हंगामापासून पुणेकर ऋतुराज गायकवाड सीएसकेचं नेतृत्व करणार आहे. सलामीच्या सामन्याआधी रंगारंग कार्यक्रम पार पडला. रंगारंग कार्यकमाआधी सीएसकेचा नवनिर्वािचित कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे.
सलामीच्या सामन्याआधी सीएसकेला गोड बातमी मिळाली आहे. सीएसकेचा एक स्टार वेगवान गोलंदाज हा फीट असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे हा खेळाडू लवकरच टीमसोबत जोडला जाणार आहे. दुखापतीनंतर मथीशा पथीराणा याला ग्रीन सिग्नल मिळाळा आहे. त्यामुळे मथीाशा लवकरच सीएसके टीमसोबत जोडला जाणार आहे. त्यामुळे सीएसकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
मथीशा पथीराणा याला 6 मार्च रोजी बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यामध्ये दुखापत झाली होती. मथीशाला हॅमस्ट्रिंग लेव्हन 1 दुखापत झाली होती. मात्र त्यानंतर मथीशाने सर्व औपचाराकिता पूर्ण केल्या आहेत. मथीशा पू्र्णपणे सज्ज झाला आहे. मथीशाबाबतची ही मोठी अपडेट त्याचा मॅनेजर अमिला कलुगालेगे याने एक्सवरुन (ट्विट) दिली आहे. “मथीशा वेगवान गोलंदाजासाठी तयार आहे, तयार रहा”, असं ट्विट अमिला याने केलं आहे.
टीम सीएसके | ऋतुराज गायकवाड, (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिशेल सेंटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधु, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षना, रचीन रवींद्र, शार्दूल ठाकुर, डेरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान आणि अवनीश राव अरावली.
टीम आरसीबी | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन) यश दयाल, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार वायझॅक, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, कॅमरन, मोहम्मद सिराज, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत.