मुंबई : आयपीएल 2024 ला सुरू व्हायला अवघे काही तास बाकी राहिले आहेत. सर्व संघ आता सरावालाही लागले आहेत. दोन दिवसांनी 22 मार्चला पहिला सामना माहीच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच चेपॉकवर होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात विजयाचा श्रीगणेशा कोण करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धोनीची बॅटींग पाहण्यासाठी थालाचे चाहतेही आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच धोनीचा चेपॉकवरील सराव करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
महेंद्र सिंह धोनीचा आवडता आणि स्पेशल असलेला हेलिकॉप्टर शॉटची मेजवाणी पाहायला मिळाली. घातक फिनिशर ओळख असलेल्या धोनीने सराव करताना तुळजारपूर एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजवर्धन हंगेरकरविरूद्ध कडक शॉट खेळले. यामध्ये हेलिकॉप्टर शॉटचाही समावेश होता. या शॉटचा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. धोनीच्या चाहत्यांना येत्या हंगामामध्ये त्याच्याकडून अशाच दमदार शॉटसह मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
MS Dhoni with a helicopter shot in the practice session.
– MSD is preparing hard for the IPL.pic.twitter.com/6YDYRK8QQy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 19, 2024
महेंद्र सिंह धोनी याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे मागील हंगामात त्याच्या खेळण्याबाबत शंकाच होती. परंतु आता धोनी आगामी मोसमासाठी फिट झाला आहे.
Thala Dhoni banging Lord Shardul😭💛#IPL2024 pic.twitter.com/bnJ3ac1Kbn
— Hustler (@HustlerCSK) March 19, 2024
सीएसकेचा पहिला सामना आरसीबीविरूद्ध असणार आहे. धोनीचा आरसीबीविरूद्ध दमदार रेकॉर्ड असून त्याने चांगल्याच धावा काढल्या आहेत. 34 सामन्यात 39.95 च्या सरासरीने 839 धावा केल्या असून इतर संघांपेक्षा या आरसीबीविरूद्ध सर्वाधिक धावा आहेत. आरसीबीविरुद्ध 4 अर्धशतकी खेळी खेळली आणि 11 वेळा नाबाद राहिला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल फायनल संंघ 2024 : एम.एस. धोनी (C), मोईन अली, दीपक चहर, डेव्हॉन कॉनवे, तुषार देशपांडे, शिवम दुबे, रुतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथीराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद सिंग, मिचेल सिंग, शेख रशीद. , निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश थेक्षाना, रचिन रवींद्र, शार्दुल ठाकूर, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, मुस्तफिजुर रहमान, अवनीश राव अरावेली.