आयपीएल 2024 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. या सामन्यातील निकाल प्लेऑफमधील चौथा संघ ठरवणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी सामना 18 धावांनी किंवा 18.1 षटकात दिलेलं टार्गेट पूर्ण करावं लागले. पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. हा सामना पावसामुळे झालाच नाही तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल आणि चेन्नईची प्लेऑफमध्ये एन्ट्री होईल. दुसरीकडे, पाऊस पडला आणि कमी षटकांचा खेळ झाला तर काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण चेन्नई सुपर किंग्सचा नेट रनरेट हा आरसीबीपेक्षा खूपच चांगला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं पुढचं गणित कसं असेल हे जाणून घेऊयात. चेन्नई सुपर किंग्स 14 गुणांसह चौथ्या आणि आरसीबी 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. चेन्नईला फक्त विजयाची गरज आहे. तर आरसीबीला विजयासह नेट रनरेटचं गणित सांभाळावं लागणार आहे.
दक्षिण कर्नाटकात 18 ते 20 मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 18 मे रोजी सामना होणार आहे. पावसाचा अंदाज खरा ठरला तर षटकं कमी केली जाऊ शकतात. यापूर्वी दोन सामन्यात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हे सामने रद्द करण्यात आले होते आणि प्रत्येकी एक गुण दिला होता.
वरील गणित पाहता कितीही षटकांचा खेळ झाला आणि कितीही धावा दिल्या. तर एकच सूत्र लागू होतं. ते म्हणजे दिलेलं टार्गेट 11 चेंडू राखून पूर्ण करायचं. याउलट चेन्नईला टार्गेट दिलं तर 18 धावांनी जिंकायचं.