आयपीएल 2024 स्पर्धेच्या 46 व्या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर ऋतुराज गायकवाड नाराज झाला होता. कारण दुसऱ्या डावात पडत असलेल्या दव पाहता गोलंदाजी करणं कठीण जातं. याचा अंदाज असल्याने त्याने नाणेफेक गमवल्याचं दु:ख व्यक्त केलं होतं. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. पहिल्यांदा मिळालेली फलंदाजी चेन्नई सुपर किंग्सच्या पथ्यावर पडली.चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 3 गडी गमवून 212 धावा केल्या आणि विजयासाठी 213 धावांचं आव्हान दिलं. सनरायझर्स हैदराबादचा संघ मात्र 18.5 षटकात सर्वबाद 134 धावा करू शकला. चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादला 78 धावांनी पराभूत केलं. खरं तर या सामन्यात ऋतुराज गायकवाडने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली. त्याने केलेल्या 98 धावांच्या जोरावर संघाला 200 पार मजल मारता आली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या सामन्यानंतर विजयाचं श्रेय देताना कर्णधार ऋतुराज गायकवाडने टर्निंग पॉइंट सांगितला.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड म्हणाला की, ” इम्पॅक्ट प्लेयर्स नियमामुळे तुम्हाला नेहमी अतिरिक्त 20 धावा हव्या असतात. पॉवरप्लेमध्ये विकेट न देणं. हाच एकमेव मार्ग आहे की विरोधकांना बॅकफूटवर ढकलू शकतो. देशपांडेने खरंच चांगली गोलंदाजी केवी. त्याच्या मेहनतीचे फळ मिळालं आहे. जडेजाचाही इथे उल्लेख करेन. या ओल्या मैदानात फक्त 22 धावा देणं हाच सामना टर्निंग स्पेल होता. मी जास्त बोलत नाही. ड्रेसिंग रूममध्ये वरिष्ठांना काय करावे हे सांगता येत नाही. तुम्हाला मागची जागा घ्यायची आणि त्यांना त्यांचे काम करू द्यायचं.” तुषार देशपांडेने 3 षटकात 27 धावा देत 4 गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाने 4 षटकात फक्त 22 धावा देत 1 गडी बाद केला.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.