आयपीएल 2024 स्पर्धेतील 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. चेन्नई सुपर किंग्सला विजयाच्या ट्रॅकवर परतण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्स सध्या सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये स्थान मिळवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे. चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकत 20 षटकात 3 गडी गमवून 212 धावा केल्या. तसेच विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान आता सनरायझर्स हैदराबाद गाठणार का? हा प्रश्न आहे. सनरायझर्स हैदराबादने हा सामना जिंकला तर थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. दुसऱ्या डावात दव फॅक्टर खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे फॉर्मात असलेल्या ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेन्रिक क्लासेन, मार्करम यांच्यासमोर गोलंदाजी करण्याचं आव्हान आहे. पथिराना आणि श्रेयस देशपांडेच्या स्पेलवर सर्वकाही अवलंबून आहे.
चेन्नई सुपर किंग्सची सुरुवात हवी तशी झाली नाही. अजिंक्य रहाणेला या सामन्यातही काही फॉर्म गवसला नाही. ओपनिंगला आलेला अजिंक्य रहाणे चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरला. अजिंक्य रहाणेनं 12 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 9 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर फटका मारताना शहाबाजच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि डेरिल मिचेल यांनी मोर्चा सांभाळला. दोघांच्या भागीदारीने हैदराबादच्या गोलंदाजांचा घाम निघाला. दोघांनी 107 धावांची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाड 98 धावा करून बाद झाला. त्याने 54 धावात 98 धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन