DC vs SRH : 3 सिक्स 5 फोर, डेव्हीड वॉर्नर याचं तडाखेदार अर्धशतक, दिल्लीची कडक सुरुवात

| Updated on: Mar 31, 2024 | 8:47 PM

David Warner Fifty : डेव्हीड वॉर्नर याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विस्फोटक खेळी करत झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. तसेच वॉर्नरने पृथ्वी शॉसोबत दिल्लीला अप्रतिम सुरुवात करुन दिली.

DC vs SRH :  3 सिक्स 5 फोर, डेव्हीड वॉर्नर याचं तडाखेदार अर्धशतक, दिल्लीची कडक सुरुवात
david warner dc vs csk ipl 2024,
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

आयपीएलमधील सर्वात यशस्वी विदेशी फलंदाज अशी बिरुदावली मिरवणाऱ्या डेव्हिड वॉर्नर याने 17 व्या हंगामातील 13 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध तडाखेदार अर्धशतक ठोकलं आहे. डेव्हिड वॉर्नर याने पृथ्वी शॉ याच्यासोबत दिल्लीला अप्रतिम सुरुवात करुन देत जोरदार फटकेबाजी केली. वॉर्नरने या दरम्यान मैदानात चौफेर फटकेबाजी केली. वॉर्नरने अवघ्या 32 बॉलच्या मदतीने अर्धशतक ठोकलं. वॉर्नरच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 66 वं अर्धशतक ठरलं.

वॉर्नरने अवघ्या 32 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने 156.25 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. वॉर्नरचं हे आयपीएलमधील 66 वं अर्धशतक ठरलंय. तसेच वॉर्नरने यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम आणखी भक्कम केला. आयपीएलमध्ये वॉर्नरच्या नावावर सर्वाधिक 66 अर्धशतकं आहेत. वॉर्नरनंतर विराट कोहली, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या नावावर अनुक्रमे 59, 53 आणि 43 अर्धशतकांची नोंद आहे.

मथीशा पथीराणा याचा अप्रतिम कॅच

वॉर्नरला अर्धशतकानंतर मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र मथीशा पथीराणा याने अप्रतिम कॅच घेत डेव्हीड वॉर्नर याच्या खेळीला ब्रेक लावला. वॉर्नर अर्धशतकानंतर 2 धावांनंतर आऊट झाला. वॉर्नर 35 बॉलमध्ये 52 धावा करुन माघारी परतला. मुस्तफिजुर रहमान याने त्याला आऊट केलं.

93 धावांची सलामी भागीदारी

दरम्यान पृथ्वी शॉ आणि डेव्हीड वॉर्नर या दोघांनी दिल्लीला अफलातून सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी 57 बॉलमध्ये 93 धावा जोडल्या. मात्र वॉर्नर आऊट झाल्याने ही जोडी इथेच फुटली.

डेव्हीड वॉर्नर याचं तडाखेदार अर्धशतक

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिचेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मथीशा पथिराना आणि मुस्तफिजुर रहमान.