आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध कोलकात नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. दिल्लीचा हा या हंगामातील चौथा आणि कोलकाताचा तिसरा सामना असणार आहे. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये एका विजयासह सातव्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स 2 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोलकाताने या हंगामात खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे कोलकाताचा दिल्ली विरुद्ध विजयी हॅटट्रिक पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीला पहिल्या 2 सामन्यात पराभूत झाल्यानंतर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवता आला. त्यामुळे दिल्लीसमोर कोलकाताचा विजयीरथ रोखून विजयी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याबाबत जाणून घेऊयात.
दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना 3 एप्रिल रोजी होणार आहे.
दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना डॉ वायएस राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमध्ये खेळवण्यात येणार आहे.
दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
दिल्ली विरुद्ध कोलकाता सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल. तर मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर ही मॅच पाहता येईल.
दिल्ली कॅपिट्ल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धुल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झ्ये रिचर्डसन, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण यादव. दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क.
कोलकाता नाईट रायडर्स टीम : श्रेयस अय्यर (कॅप्टन), श्रीकर भारत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरेन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, मुजे राणा रहमान, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि फिलिप सॉल्ट.