DC vs LSG : केएल राहुलचा अप्रतिम कॅच, संजीव गोयंका यांची रिएक्शन व्हायरल

| Updated on: May 14, 2024 | 9:16 PM

Sanjeev Goenka Reaction on K L Rahul Catch : संजीव गोयंका आणि केएल राहुल दोघेही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता केएलने कॅच घेतल्यानंतर संजीव गोयंका यांची रिएक्शन व्हायरल झाली आहे.

DC vs LSG : केएल राहुलचा अप्रतिम कॅच,  संजीव गोयंका यांची रिएक्शन व्हायरल
Sanjeev Goenka Reaction on K L Rahul Catch
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अतिशय महत्त्वाचा आणि करो या मरो असा आहे. लखनऊने या सामन्यात टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं. अर्शद खान याने लखनऊकडून पहिली ओव्हर टाकली. अर्शदने दिल्लीचा डावातील दुसऱ्याच बॉलवर पहिला झटका दिला. अर्शदने धोकादायक जॅक फ्रेझर मॅकग्रुक याला नवीन उल हक याच्या हाती कॅच आऊट केलं. जॅकला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे दिल्लीची स्थिती 2 बाद 1 अशी झाली.

त्यानंतर अभिषेक पोरेल आणि शाई होप या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत लखनऊचा डाव पूर्णपणे नियंत्रणात आणला. या दरम्यान अभिषेक पोरेलने अर्धशतक ठोकलं. तर शाई होप सेट झाला होता. या दोघांनी पावर प्लेमध्ये जोरदार फटकेबाजी करत दिल्लीला मजबूत स्थितीत आणून ठेवलं. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 92 रन्सची पार्टनरशीप केली. त्यामुळे लखनऊची डोकेदुखी वाढली. लखनऊ विकेटच्या शोधात असताना कॅप्टन केएल राहुल याने शाई होप याचा अप्रतिम कॅच घेत ही जोडी फोडली. केएलने घेतलेल्या या कॅचनंतर लखनऊचे मालक संजीव गोयंका यांनी टाळ्या वाजवून केएलने घेतलेल्या या कॅचचं कौतुक केलं.

केएलला दुसऱ्या प्रयत्नात यश

रवी बिश्नोई लखनऊच्या डावातील नववी ओव्हर टाकायला आला. शाई होपने या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर फटका मारला. शाई होपने मारलेला फटका केएल राहुलच्या दिशेने गेला. केएलने पहिल्या फटक्यात कॅच घेतलेला सोडला मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्याने झेप घेत कॅच पूर्ण केली. केएलने घेतलेला कॅच पाहून संजीव गोयंका यांनी त्याचं बसल्या जागेवर उभं राहत कौतुक केलं.

केएलचा कडक कॅच संजीव गोयंकाची रिएक्शन व्हायरल

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), अभिषेक पोरेल, जेक फ्रेझर मॅकगुर्क, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदिन नायब, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि खलील अहमद.

लखनऊ सुपर जायंट्स प्लेईंग ईलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, युधवीर सिंग चरक, अर्शद खान, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक आणि मोहसिन खान.