आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 64 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात प्लेऑफच्या शर्यतीत कायम राखण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. ऋषभ पंत याच्याकडे दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व असणार आहे. तर केएल राहुल लखनऊची कॅप्टन्सी करणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे. त्यामुळे दोन्ही कर्णधारांचा चांगलाच कस लागणार आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांना चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे.
दिल्ली कॅपिट्ल्सला ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत रविवारी 12 मे रोजी आरसीबी विरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्या पराभवानंतर दिल्लीची प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता ही 0.5 टक्के इतकीच आहे. त्यामुळे दिल्लीसाठी प्लेऑफची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सला आव्हान कायम ठेवायचं असेल, तर हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.
दिल्लीचा हा 14 वा आणि लखनऊचा 13 वा सामना असणार आहे. दिल्लीने 13 पैकी 6 सामने जिंकले आहेत. दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहे. तर लखनऊ सुपर जायंट्सने 12 पैकी 6 सामने जिंकलेत. दोन्ही संघांनी समसमान सामने जिंकले आहेत. मात्र लखनऊच्या तुलनेत दिल्लीचा नेट रनरेट सरस असल्याने ते पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी आहेत. तर लखनऊ सातव्या क्रमांकावर आहे. दरम्यान उभयसंघातील हा दुसरा सामना असणार आहे. याआधी दिल्लीने लखनऊवर 12 एप्रिल रोजी 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.
दिल्ली विरुद्ध लखनऊ सामना 14 मे रोजी होणार आहे.
दिल्ली विरुद्ध लखनऊ सामना अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे होणार आहे.
दिल्ली विरुद्ध लखनऊ सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
दिल्ली विरुद्ध लखनऊ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
दिल्ली विरुद्ध लखनऊ सामना मोबाईलवर फुकटात जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.
दिल्ली कॅपिट्ल्स टीम : ऋषभ पंत (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धुल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्रा, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झ्ये रिचर्डसन, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव आणि जेक फ्रेझर-मॅकगर्क.
लखनऊ सुपर जायंट्स टीम : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शमर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, प्रेराक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक होउ, कृष्णा हो गौथम, ॲश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.