IPL 2024, DC vs PBKS : 453 दिवसानंतर ऋषभ पंत मैदानात, पहिल्याच सामन्यात काय केलं वाचा

| Updated on: Mar 23, 2024 | 6:08 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरु आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नरने चांगली सुरुवात करून दिली. पण या दोघांच्या विकेट पडल्यानंतर मैदानात ऋषभ पंत उतरला.

IPL 2024, DC vs PBKS : 453 दिवसानंतर ऋषभ पंत मैदानात, पहिल्याच सामन्यात काय केलं वाचा
ऋषभ पंत
Follow us on

आयपीएलचा दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सच्या यांच्यात होत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकत दिल्लीने गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि दिल्लीला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. या सामन्यात क्रीडाप्रेमींना उत्सुकता होती ती ऋषभ पंतच्या खेळीची..यासाठी चाहत्यांना आठ षटकं वाट पाहावी लागली. आठव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षल पटेलने डेविड वॉर्नरला बाउंसरवर गुंतवलं आणि जोरदार अपील केलं. मात्र पंचांना नाबाद घोषित केलं. मात्र शिखर धवनने रिव्ह्यू घेतला आणि डीआरएसमध्ये बाद झाला. त्यानंतर 453 दिवसानंतर ऋषभ पंत मैदानात उतरला. ब्रारच्या नवव्या षटकाच्या दुसरा चेंडू खेळण्याची संधी ऋषभ पंतला मिळाली. पण हा चेंडू निर्धाव गेला आणि तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेत फलंदाजीला सुरुवात केली. त्याच्या सोबतीला वेस्ट इंडिजचा शाई होप होता आणि त्याची उत्तम साथ त्याला मिळताना दिसली. पण सुरुवातीला ऋषभ पंत चाचपडताना दिसला. तेव्हा समालोचक असलेल्या विरेंद्र सेहवागने आपलं मत मांडलं.

विरेंद्र सेहवाने सांगितलं की, “हा जुना ऋषभ पंत असता तर ऑफ स्पिनरला फोडला असता. पण दुखापतीतून सावरून मैदानात उतरला आहे. त्याला पुन्हा एकदा तशीच लय मिळवण्यासाठी आणखी चार ते पाच सामन्यांचा अवधी लागू शकतो.” ऋषभ पंतने चाहरच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारला. चेंडूखाली हर्षल पटेल आला होता. मात्र सूर्यप्रकाशामुळे कॅच पकडणं कठीण झालं आणि ऋषभ पंतला जीवदान मिळालं आणि खात्यात पहिला चौकार आला.

ऋषभ पंतने 12 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 18 धावा केल्या. हर्षल पटेलच्या वेगवान चेंडूचा फायदा घेऊन मागे कट करण्याचा प्रयत्न होता. पण चेंडू पूर्णपणे बॅटच्या थोडा मधे लागल्याने थेट बेअरस्टोच्या हाती गेला. त्यामुळे ऋषभ पंतची खेळी 18 धावांवर संपुष्टात आली. खरं तर ऋषभ पंतकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. आता पुढच्या सामन्यात त्याच्याकडून आक्रमक फटकेबाजीची अपेक्षा असणार आहे. दुसरीकडे, दुसऱ्या डावात ऋषभ पंत विकेटकीपिंग करताना दिसला. त्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये कार अपघात झाला होता. त्यात पंत गंभीर जखमी झाला होता. मात्र, तो अकाली बरा झाला आहे.