IPL 2024, DC vs PBKS : पंजाब किंग्सची दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्स राखून सरशी

| Updated on: Mar 23, 2024 | 7:31 PM

आयपीएलच्या 17 व्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात दुसरा सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर गडी राखून विजय मिळवला. या विजयासह पदरात दोन गुण पडले आहेत.

IPL 2024, DC vs PBKS : पंजाब किंग्सची दिल्ली कॅपिटल्सवर 4 विकेट्स राखून सरशी
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत केलं.पंजाब किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दिल्ली कॅपिटल्सने फलंदाजी करत 20 षटकात 9 गडी गमवून 174 धावा केल्या आणि विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान पंजाब किंग्सने शेवटच्या षटकात 6 गडी गमवून गाठलं. सॅम करन आणि लियाम लिविंगस्टोनच्या भागीदारीने हा विजय सोपा झाला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. तर सॅम करनने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकलं. 14 व्या षटकात कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर सॅम करनचा झेल सोडणं महागात पडलं. स्टब्सने सोपा झेल सोडल्याने दिल्लीला फायदा झाला. सॅम करन तेव्हा फक्त 33 धावांवर होता.  सॅम करनने 47 चेंडूत 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. याता 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्यानंतर डेविड वॉर्नरने ऐन मोक्याच्या क्षणी ब्रारचा झेल सोडला. 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ही सर्वात मोठी चूक घडली. त्यामुळे दिल्लीला विजय मिळवता आला.

पंजाब किंग्सकडून कर्णधार शिखर धवनने 22, जॉनी बेअरस्टोने 9, प्रभसिमरन सिंग 26, सॅम करनने 63, जितेश शर्मा 9, शशांक सिंग 0 असे बाद झाले. तर लियाम लिविंगस्टोन नाबाद 38 आणि हरप्रीत ब्रार नाबाद 2 धावांवर बाद झाला आहे. सॅम करन या विजयाचा हिरो ठरला. त्याने 63 धावांची खेळी खेळली. दिल्लीचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने 19 व्या षटकात लागोपाठ दोन चेंडूंवर विकेट घेतल्याने दिल्लीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्याने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सॅम कुरनला बाद केले आणि चौथ्या चेंडूवर शशांक सिंगला झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या ब्रारला एक चेंडू निर्धाव गेला आणि शेवटच्या चेंडूवर उंच उडालेला झेल डेविड वॉर्नरने सोडला.

या विजयासह पंजाब किंग्सच्या पदरात दोन गुण पडले आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण 33 सामन्यांची आकेडवारी पाहता पंजाब किंग्सने 17 तर दिल्ली कॅपिटल्सच्या नावावर 16 विजय आहेत. त्यामुळे या विजयासाठी आकडेवारीत पंजाब किंग्सने आघाडी घेतली आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), रिकी भुई, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा.

पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग, शशांक सिंग.