आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जबरदस्त सामना झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 20 धावांनी जिंकला. तसेच प्लेऑफच्या रेसमध्ये असल्याचं दाखवून दिलं. दिल्ली कॅपिटल्सने 8 गडी गमवून 221 धावा केल्या आणि विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थान रॉयल्स संघ 201 धावा करून शकला. या सामन्यात संजू सॅमसनची विकेट खऱ्या अर्थान टर्निंग पॉइंट ठरली. तो बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव पत्त्यासारखा कोसळला. त्याने 86 धावांची खेळी केली होती. मात्र मुकेश कुमारच्या षटकात फ्लॅट सिक्स मारताना सीमेवर त्याचा झेल शाई होपने पकडला. पण त्याचा पाय सीमारेषेला टच झाला की नाही यावरून बरंच काही झालं. इतकंच काय तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर संजू सॅमसनने पंचांशी वाद घातला. तसेच रिव्ह्यू घेण्यासाठी प्रयत्न केला.मात्र तिथपर्यंत सर्वकाही ठरलं होतं. अखेर कर्णधार संजू सॅमसनला हताश होत मैदानाबाहेर पडावं लागलं. यानंतस सोशल मीडियावर बराच वाद रंगला. संजू सॅमसनच्या बाजूने अनेकांनी पोस्ट लिहिल्या. दुसरीकडे, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याने संजू सॅमसनला दंड ठोठावण्यात आला. मात्र इतकं होऊनही प्रश्न अनुत्तरीतच होता. आता नव्या व्हिडीओने या सर्व प्रश्नांना पूर्ण विराम लागला. संजू सॅमसन बाद असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.
आयपीएल स्पर्धेसाठी ब्रॉडकास्टर असलेल्या स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडीओ तयार केला आहे. त्या संजू सॅमसन बाद असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या व्हिडीओत शाई होपचा पाय रेषेला टच झाला नसल्याचं दिसत आहे. यावेळी व्हिडीओचं विश्लेषण करण्यासाठी आयपीएल विनिंग कोच टॉम मूडी होता. त्याने या झेलचं योग्य विश्लेषण केलं. शाई होपने झेल घेतला तेव्हा बॉण्ड्री कुशन हलली नाही, असं त्यांनी सांगितलं.
Out or Not Out!? 🤔
Here's a closer look at why #SanjuSamson was given out last night v Delhi Capitals – a moment which changed the course of the match. @TomMoodyCricket and @jatinsapru dissected each and every replay available to demonstrate why the third umpire made the… pic.twitter.com/xZeySOSmd4
— Star Sports (@StarSportsIndia) May 8, 2024
दुसरीकडे, नवजोतसिंग सिद्धूने वेगळ्या व्हि़डीओत सांगितलं की, होपने ब्रॉण्ड्री लाईनला पाय टच केला. “संजू सॅमसन बाद झाल्यानंतर सामन्याचं चित्र पालटलं. पण या निर्णयाबाबत मतमतांतरं आहेत. जर तुम्ही साईट अँगलने पाहाल तर त्याने बॉण्ड्री लाईनला दोनदा पाय टच केल्याचं कळत आहे. एकतर तुम्ही तंत्रज्ञान वापरू नका, किंवा जर तुम्ही ते वापरत असाल आणि तंत्रज्ञान चूक करत असेल, तर असे आहे की दुधात माशी आहे आणि कोणीतरी तुम्हाला ते पिण्यास सांगत आहे.”, नवजोत सिंग सिद्धू यांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.”मी तटस्थ व्यक्ती आहे, म्हणून मी तो पाहिला आहे, तो नॉटआऊट आहे. त्यामुळेच मी कोहलीबद्दलही असे म्हणत राहिलो.”, असंही नवजोतसिंग सिद्धू पुढे म्हणाला.