IPl 2024 तोंडावर असताना ‘या’ खेळाडूची तडकाफडकी माघार, ‘या’ टीमच्या 4 कोटींचा चुराडा
आयपीएल 2024 स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी सात ते आठ दिवस बाकी आहेत. मात्र एका संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीमच्या महत्त्वाच्या खेळाडूने तडकाफडकी असा निर्णय घेतल्याने मॅनेंजमेंट समोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.
1 / 5
आयपीएलमधील प्रत्येक संघ काहीना काही अडचणींचा सामना करत असल्याचं दिसत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुखापतीमुळे तगड्या संघानाही फटका बसण्याची शक्यता आहे. सीएसके संघामध्ये अनेक खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत.
2 / 5
मुंबई इंडियन्समध्ये सूर्यकुमार यादव, कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कॅप्टन श्रेयस अय्यर हासुद्धा पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्यामुळे टीम मॅनेजमेंटसमोर मोठं आव्हान असणार आहे.
3 / 5
आधीच दुखपातींची साडेसाती टीम्सच्या मागे लागलेली असताना स्टार खेळाडूने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूला संघात घेण्यासाठी फ्रँचायसींनी कोटी रूपये लावले होते.
4 / 5
दिल्ली कॅपिटल्स संघाचा खेळाडू हॅरी ब्रूक याने आपण खेळणार नसून नाव मागे घेतलं आहे. गेल्या वर्षी आयपीएल 2023 मध्ये ब्रूकची कामगिरी खूपच खराब होती. सनरायझर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं.
5 / 5
हॅरी ब्रूक याने मागील सीझनमध्ये अवघ्या 190 धावा केल्या होत्या. त्यामुळे हैदराबाद संघाने त्याला रीलीज केलं होतं. यंदाच्या लिलावामध्ये दिल्ली संघाने त्याला 4 कोटी रूपयांना विकत घेतलं होतं. आता त्याने नाव मागे घेतल्याने दिल्लीला पर्यायी खेळाडू शोधला पाहिजे. ॲलेक्स हेल्स, जेसन रॉय आणि मिशेल स्टार्क यांसारख्या खेळाडूंनीही यापूर्वी अशीच कारणे सांगून आपली नावे मागे घेतली होतीत.