आयपीएल 2024 स्पर्धेतील 74 वा सामना अर्थात अंतिम फेरीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. जेतेपदासाठी दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. त्यामुळे या दोन एक संघ जेतेपद मिळवणार हे आता नक्की झालं आहे. पण या सामन्यादरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्याता आहे. हा पाऊस सामन्यादरम्यात कायमही राहू शकतो असं बोललं जात आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांची धाकधूक वाढली आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तर निकाल कसा लागणार? असा प्रश्न चाहत्यांना सतावत आहे. अंतिम सामन्यात नाणेफेकीला पावसामुळे उशीर झाला तर षटकं कापली जाणार नाहीत. सामना सुरु होण्याता 9.40 पर्यंतचा वेळ झाला तरी 20 षटकं पूर्ण होतील. त्यामुळे दोन्ही संघांना पूर्ण 20 षटकांचा खेळ खेळता येईल. पण हा सामना 9.40 नंतर सुरु झाला तर मात्र षटकं कमी केली जातील. प्रत्येक आठ मिनिटांसाठी एक षटक वजा होईल.
अंतिम सामन्यासाठी 2 तासांचा अतिरिक्त अवधी दिला आहे. आयपीएल सामन्याची नियोजित वेळ ही 3 तास 15 मिनिटांची आहे. पावसामुळे किंवा इतर कारणामुळे सामन्यात व्यत्यय आला तर अतिरिक्त दोन तास वापरले जातील. म्हणजेच अंतिम फेरीचा सामना संध्याकाळी 7.30 ते 1 या वेळेत होणार आहे. जर सामना या वेळेत पूर्ण झाला नाही तर राखीव दिवस वापरला जाईल. राखीव दिवशी सामना पूर्णपणे नव्याने खेळला जाईल. म्हणजेच पावसामुळे नियोजित दिवशी सामना मध्यातच रद्द झाला तरी राखीव दिवशी नव्याने टॉससह सुरु होईल.
राखीव दिवशीही पाऊस पडला तर अतिरिक्त 2 तास मिळतील. रात्री 11.56 मिनिटांनी सामना सुरु करण्याची वेळ आली तर हा सामना 5 षटकांचा होईल. तसेच सामना 12.56 ला संपेल की नाही याची चाचपणी सामनाधिकारी करतील. जर यात पाच षटकांचा खेळ पूर्ण होणार नसेल. तर मग सुपर ओव्हरने अंतिम सामन्याचा निकाल दिला जाईल. पण सुपर ओव्हरही शक्य झाली नाही तर मात्र अंतिम फेरीचा सामना रद्द केला जाईल. सामन्याचा निकाल साखळी फेरीतील कामगिरीवर दिला जाईल. अर्थात याचा फायदा सर्वाधिक गुण मिळवलेल्या संघाला होईल. तो संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स..तर सनरायझर्स हैदराबादला उपविजेतेपदावर सामाधान मानावं लागेल.