IPL 2024 चॅम्पियन होताच दिग्गज खेळाडूचा मोठा निर्णय! निवृत्तीबाबत स्पष्टच म्हणाला…

| Updated on: May 27, 2024 | 4:17 PM

Retirement: कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएलच्या 17 व्या मोसमातील विजेतेपद मिळवून देण्यात या स्टार खेळाडूने निर्णायक भूमिका बजावली. या खेळाडूने सामन्यानंतर निवृत्तीबाबत काय म्हटलं?

IPL 2024 चॅम्पियन होताच दिग्गज खेळाडूचा मोठा निर्णय! निवृत्तीबाबत स्पष्टच म्हणाला...
kkr ipl 2024 trophy
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील महाअंतिम सामन्यात रविवारी 26 मे रोजी सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला. केकेआर या विजयासह आयपीएल चॅम्पियन ठरली.केकेआरने तब्बल 10 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर ट्रॉफी उंचावली. केकेआरची ही आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची एकूण तिसरी आणि एमए चिदंबरम स्टेडियममधील दुसरी वेळ ठरली. केकेआरने याआधी 2012 साली पहिल्यांदा चेन्नईचा पराभव करत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. केकेआरच्या विजयानंतर स्टार गोलंदाजाने निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तो खेळाडू कोण आहे आणि निवृत्तीबाबत बोलताना त्याने काय म्हटलं? जाणून घेऊयात.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला मिचेल स्टार्क याने कारकीर्दीबाबत मोठी अपडेट दिली आहे. फ्रँचायजी क्रिकेट स्पर्धेत भरीव कामगिरी करण्यासाठी वनडे फॉर्मेटपासून दूर व्हावं लागेल,असं स्टार्कने म्हटलं. कारण आता वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेला बराच वेळ आहे. तोवर शरीर तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळण्यासाठी फिट असेल याची शाश्वती नाही, असं स्टार्कने सांगितलं.

मिचेल स्टार्कला साखळी फेरीत भरीव कामगिरी करता आली नाही. त्यामुळे केकेआरचे 24 कोटी पाण्यात गेले, अशी टीका मिचेलवर करण्यात आली. मात्र मिचेलने मोक्याच्या क्षणी गिअर बदलला आणि टीकाकारांना आपल्या कामगिरीने चोख उत्तर दिलं. स्टार्कने क्वालिफायर 1 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. तर अंतिम सामन्यात 3 ओव्हरमध्ये अवघ्या 14 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेत हैदराबादला बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं. मिचेलला त्याच्या या कामगिरीसाठी अंतिम सामन्यानंतर ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

मिचेल स्टार्क काय म्हणाला?

“मी गेल्या 9 वर्षांपासून ऑस्ट्रेलिया क्रिकेटला प्राथमितकता देत आयपीएलपासून दूर राहिलो, कारण शरीराला विश्रांतीची आणि कुटुंबाला वेळ देणं गरजेचं होतं. मात्र आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मला आता एका फॉर्मेटपासून दूर व्हावं लागणार आहे. पुढील वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला बराच वेळ आहे. मी या फॉर्मेटपासून दूर झालो, तर मला फ्रँचायजी क्रिकेटचे दरवाजे उघडतील. मी हा हंगाम फार एन्जॉय केला. आता टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या अनुषगांने आयपीएल खेळणं फायदेशीर ठरलं”, असं मिचेल स्टार्कने म्हटलं. सामन्यानंतर स्टार्कने पत्रकार परिषदेत निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली.

“पुढील वर्षाच्या वेळापत्रकाबाबत मला नीट माहित नाही. मात्र आता मी जसं म्हटलं त्यानुसार, मी फार आनंद घेतला आणि आगामी हंगामाची वाट पाहत आहे. पुढील हंगामही यंदासारखाच पर्पल गोल्ड होईल”, असं स्टार्कने म्हटलं. केकेआरच्या जर्सीचा रंग पर्पल आहे. तसेच पुढील हंगामाआधी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे स्टार्कने पुढील हंगामात पुन्हा पर्पल-गोल्ड असेल अर्थात तो केकेआरकडून खेळेल, अशी आशा त्याने व्यक्त केली.