गुजरात टायटन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 59 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर 35 धावांनी विजय मिळवला आहे. गुजरातने चेन्नई सुपर किंग्सला विजयासाठी 232 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 196 धावांपर्यंतच मजल मारता आली. गुजरातने या विजयासह चेन्नईच्या मागील पराभवाचा वचपा घेतला. उभयसंघात 26 मार्च रोजी सामना झाला होता. तेव्हा चेन्नईने गुजरातवर 63 धावांनी विजय मिळवला होता. आता गुजरातने या पराभवाचा वचपा घेत हिशोब क्लिअर केलाय. तसेच प्लेऑफमधील आव्हान कायमही राखलंय. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचं पराभवामुळे टेन्शन वाढलं आहे. चेन्नईचं या पराभवासह प्लेऑफच्या हिशोबाने समीकरण बदललं आहे.
चेन्नईची 232 धावांचा पाठलाग करताना फ्लॉप सुरुवात झाली. चेन्नईचे पहिले 3 फलंदाज हे 1,1 आणि 0 असे आऊट झाले. रचीन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी 1-1 धाव केली. तर कॅप्टन ऋतुराज गायकवाड याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर डॅरेल मिचेल आणि मोईन अली या जोडीने चौथ्या विकेटसाठी 109 धावांची शतकी भागीदारी करत चेन्नईच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. मात्र त्यानंतर डॅरेल मिचेल 63 आणि मोईन अली 56 धावांवर आऊट झाले. सेट जोडी माघारी परतल्याने चेन्नई पुन्हा बॅकफुटवर गेली. त्यानंतर शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी या फलंदाजांनी विजयी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर विलंब झाला होता.
शिवम दुबे 21, रवींद्र जडेजा 18 आणि महेंद्रसिंह धोनी याने नाबाद 26 धावा केल्या. मिचेल सँटनर झिरोवर आऊट झाला. तर शार्दूल ठाकुर 3 धावांवर नाबाद परतला. गुजरातकडून मोहित शर्मा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. राशिद खाने याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर संदीप वॉरियर आणि उमेश यादव या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
त्याआधी चेन्नईने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 231 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने धमाका केला. या दोघांनी 210 धावांची सलामी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी शतकं ठोकली. मात्र शतकानंतर दोघेही आऊट झाले. शुबमन गिल याने 55 बॉलमध्ये 104 धावा केल्या. तर साईने 51 चेंडूत 103 धावा केल्या. शाहरुख खान 2 धावांवर रन आऊट झाला. डेव्हिड मिलर 16 धावांवर नाबाद परतला. तर तुषार देशपांडेने 2 विकेट्स घेतल्या.
गुजरातचा चेन्नईवर विजय
An emphatic batting display backed 🆙 by a comprehensive bowling performance 🙌#GT make it even for the season as they complete a 35 runs win over #CSK 👏
Scorecard ▶️ https://t.co/PBZfdYt4lR#TATAIPL | #GTvCSK pic.twitter.com/ThkkI35ofY
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2024
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा आणि कार्तिक त्यागी.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचीन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंह धोनी (विकेटकीपर), मिचेल सँटनर, शार्दूल ठाकुर, तुषार देशपांडे आणि सिमरजीत सिंग.