मुंबई इंडियन्सने गेल्या 11 वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवत आयपीएलच्या हंगामातील आपला पहिला सामना गमावला आहे. गुजरातने मुंबईला विजयासाठी 169 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र मुंबईला 9 विकेट्स गमावून 162 धावाच करता आल्या. गुजरातने यासह हा सामना 6 धावांनी जिंकला. शुबमन गिल कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या सामन्यात गुजरातला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरला. तर हार्दिक पंड्या रोहित शर्मा याची 11 वर्षांपासूनची परंपरा खंडीत करु शकला नाही. मुंबईला आयपीएलमध्ये 2013 पासून आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही. मुंबईने यंदाही ही पंरपरा कायम ठेवली.
मुंबईला विजयासाठी अखेरच्या ओव्हरमध्ये 19 धावांची गरज होती. मात्र उमेश यादव याने चलाखीने या धावांचा यशस्वी बचाव केला. उमेशने 20 व्या ओव्हरमध्ये 12 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेत सामना फिरवला. उमेशने मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याला आऊट केलं. त्यानंतर पीयूष चावला याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
मुंबईकडून इमपॅक्ट डेवाल्ड ब्रेव्हिस याने सर्वाधिक 46 धावा केल्या. डेवाल्डच्या या खेळीत 3 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. रोहित शर्मा याने 29 बॉलमध्ये 43 धावांचं योगदान दिलं. तिलक वर्मा याने 25 धावा जोडल्या. नमन धीर याने 20 रन्स केल्या. तर टीम डेव्हिड आणि हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. तर गेराल्ड कोएत्झी याने 1 धाव केली. ईशान किशन आणि पीयूष चावला या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर जसप्रीत बुमराह आणि शम्स मुलानी 1 धावेवर नाबाद परतले. गुजरातकडून चौघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मोहित शर्मा, उमेश यादव,स्पेनसर जॉन्सन आणि अझमतुल्लाह ओमरझई या चौघांनी 2 विकेट्स घेतल्या. तर आर साई किशोर याने एकमेव पण रोहित शर्मा याची मोठी विकेट घेतली.
गुजरातचा 6 धावांनी विजय
A game of ᴇʙʙꜱ & ꜰʟᴏᴡꜱ 🫡@gujarat_titans display quality death bowling to secure a remarkable 6️⃣ run win over #MI 👏@ShubmanGill‘s captaincy starts off with with a W
Scorecard ▶️https://t.co/oPSjdbb1YT #TATAIPL | #GTvMI pic.twitter.com/jTBxANlAtk
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
त्याआधी मुंबईने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 168 धावा केल्या. गुजरातकडून ऋद्धीमान साहा याने 19, कॅप्टन शुबमन गिल 31, साई सुदर्शन 45, अझमतुल्लाह 17, डेव्हिड मिलर 12, विजय शंकर 6*, राहुल तेवतिया 22 आणि राशिद खान 4* अशा धावा केल्या. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराह याने 3 विकेट्स घेतल्या. गेराल्ड कोएत्झी याने दोघांची विकेट काढली. तर पीयूष चावलाने 1 विकेट घेतली.
गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (डब्ल्यू), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.