आयपीएलच्या 17 व्या मोसमातील चौथा सामन्यात 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचा सामना हा गत उपविजेता संघ गुजरात टायटन्स आमनेसामने असणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाचे नवीन कर्णधार असणार आहेत. हार्दिक पंड्या ट्रेड विंडोद्वारे मुंबई इंडियन्सच्या गोटात आला. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडे असलेलं कर्णधारपद हार्दिकला दिलं. तर हार्दिकमुळे शुबमन गिल याला नेतृत्वाची जबाबदारी मिळाली. त्यामुळे दोन्ही खेळाडू हे कर्णधार म्हणून डेब्यू करणार आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधाराचा प्रयत्न आपल्या टीमला विजयी सुरुवात करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे. हा सामना कुठे आणि कधी होणार? किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना 24 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.
गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
गुजरात विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल.
गुजरात विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येईल.
गुजरात विरुद्ध मुंबई सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहता येणार आहे.
गुजरात टायटन्स टीम | शुबमन गिल (कॅप्टन), रिद्धीमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, राशीद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, उमेश यादव, नूर अहमद, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, अभिनव मनोहर, शरथ बीआर, रवी श्रीनिवासन साई किशोर, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई आणि सुशांत मिश्रा.
मुंबई इंडियन्स टीम | हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका आणि नमन धीर.