GT vs PBKS : शुबमन गिलची कॅप्टन्सी इनिंग, पंजाबला 200 धावांचं आव्हान

| Updated on: Apr 04, 2024 | 9:42 PM

IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings 1st Innings : पंजाब किंग्सला आयपीएलच्या 17 व्या मोसमात दुसऱ्यांदा विजयी होण्यासाठी 200 धावा कराव्या लागणार आहेत. कोण जिंकणार हा सामना?

GT vs PBKS : शुबमन गिलची कॅप्टन्सी इनिंग, पंजाबला 200 धावांचं आव्हान
shubman gill gt ipl 2024
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

गुजरात टायटन्स टीमने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 17 व्या सामन्यात पंजाब किंग्सला विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं आहे. कॅप्टन शुबमन गिल याने केलेल्या वादळी 89 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 199 धावा केल्या. शुबमन गिल याने गुजरातसाठी सर्वाधिक 89 रन्सचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनीही उल्लेखनीय कामगिरी केली.

शुबमन गिल याने 48 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 6 फोरच्या मदतीने 89 धावा केल्या. ओपनर ऋद्धीमान साहा याने 11 धावा केल्या. केन विलियमसन याने 26 धावांचं योगदान दिलं. केनने या खेळीत 4 चौकार लगावले. साई सुदर्शन याने 19 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने तुफानी 33 धावा केल्या. विजय शंकर 8 धावा करुन माघारी परतला. तर राहुल तेवतिया याने नॉट आऊट 23 रन्स केल्या. गुजरातकडून कगिसो रबाडा याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर हरप्रीत ब्रार आणि हर्षल पटेल या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

पंजाब जिंकणार दुसरा सामना?

दरम्यान पंजाब आणि गुजरात या दोन्ही संघांचा हा या हंगामातील चौथा सामना आहे. गुजरातने 2 सामने जिंकले आहेत तर पंजाबने 1. पराभवाबाबत हे आकडे उलटे आहेत. पंजाबने 2 सामने गमावलेत तर गुजरातने 1. त्यामुळे आता पंजाबला दुसरा विजय मिळवायचा असेल, तर कॅप्टन शिखर धवन याला टीमला चांगली सुरुवात करुन द्यावी लागणार आहे. तसेच इतर फलंदाजांनाही आपली भूमिका चोखपणे बजावावी लागेल.

पंजाबसमोर 200 धावांचं आव्हान

पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जितेश शर्मा (डब्ल्यू), प्रभसिमरन सिंग, सॅम करान, शशांक सिंग, सिकंदर रझा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कगिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.

गुजरात टायटन्स प्लेईंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, केन विल्यमसन, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव आणि दर्शन नळकांडे.