आयपीएलच्या 17 व्या मोसमात आज रविवारी 28 एप्रिल रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. फाफ डु प्लेसीस आरसीबीचा कॅप्टन आहे. तर शुबमन गिल याच्याकडे गुजरातचं नेतृत्व आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. आरसीबीने टॉस जिंकला. कॅप्टन फाफ डु प्लेसीसने बॉलिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.
गुजरात टायटन्सने आरसीबी विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. कॅप्टन शुबमन गिल याने आपल्या त्याच 1 खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला आरसीबीची ताकद एका झटक्यात दुप्पटीने वाढली आहे. आरसीबीचा स्टार ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेल याचं कमबॅक झालं आहे. मॅक्सवेलने काही दिवसांपूर्वी विश्रांतीसाठी माघार घेतली होती. मात्र आता मॅक्सवेल परतल्याने त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
गुजरात आणि बंगळुरु या दोन्ही संघांचा या हंगामातील 10 वा सामना आहे. आरसीबीने 9 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. गुजरात पॉइंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह सातव्या स्थानी आहे. तर आरसीबी सर्वात शेवटी म्हणजे 10 व्या क्रमांकावर आहे. आरसीबीने 9 पैकी फक्त 2 सामनेच जिंकले आहेत. आरसीबीने 1 महिन्याने 25 एप्रिल रोजी दुसरा सामना जिंकला होता. आरसीबीचं आव्हान हे संपुष्टात आलंय. त्यामुळे आत आरसीबीचा अखेरच्या काही सामन्यात धमाकेदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असणार आहे.
आरसीबीने टॉस जिंकला
🚨 Toss Update 🚨@RCBTweets will chase against @gujarat_titans
Follow the Match ▶️ https://t.co/SBLf0DonM7#TATAIPL | #GTvRCB pic.twitter.com/T9333ndEOR
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद आणि मोहित शर्मा.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.