GT vs RCB : विल जॅक्सचं सिक्ससह तडाखेदार शतक, विराटची फटकेबाजी, आरसीबीचा 9 विकेट्सने कडक विजय

| Updated on: Apr 28, 2024 | 7:32 PM

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru 45th Match Result In Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने विजय मिळवला. आरसीबीचा हा सलग दुसरा विजय ठरला.

GT vs RCB : विल जॅक्सचं सिक्ससह तडाखेदार शतक, विराटची फटकेबाजी, आरसीबीचा 9 विकेट्सने कडक विजय
virat kohli and Will Jacks
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरात टायटन्सवर 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सने आरसीबीला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 1 विकेट गमावून 24 बॉलआधी पूर्ण केलं. आरसीबीने 16 ओव्हरमध्ये 206 धावा केल्या. आरसीबीचा हा सलग दुसरा आणि एकूण तिसरा विजय ठरला. तर दुसऱ्या बाजूला गुजरातचं पराभवामुळे प्लेऑफच्या हिशोबाने टेन्शन वाढलं आहे. विराट कोहली आणि विल जॅक्स ही जोडी आरसीबीच्या विजयाची शिल्पकार ठरली.

विराट आणि विल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 166 धावांची नाबाद भागीदारी केली. विल जॅक्स याने सिक्स ठोकून आरसीबीला विजय मिळवून दिला. इतकंच नाही, तर त्याने शतकही पूर्ण केलं. विलने राशिद खान याने आरसीबीच्या डावातील 16 वी ओव्हर टाकली. विलने या ओव्हरमधील शेवटच्या 5 बॉलमध्ये 6,6,4,6,6, असे फटके मारले. विलने या 5 बॉलमध्ये 28 धावा केल्या आणि शतक ठोकलं. विलने 41 बॉलमध्ये 10 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 10 धावा केल्या. तर विराट कोहली याने 44 बॉलमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 70 धावा केल्या. तर कॅप्टन फाफ डु प्लेसीसने 24 धावांचं योगदान दिलं. तर गुजरातकडून आर साई किशोर याने एकमेव विकेट घेतली.

गुजरातची बॅटिंग

त्याआधी गुजरातने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 200 धावा केल्या. गुजरातकडून ऋद्धीमान साहा याने 5 आणि कॅप्टन शुबमन गिल याने 16 धावा केल्या. शाहरुख खान याने 30 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 सिक्ससह 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर ही जोडी नाबाद परतली. साईने 49 बॉलमध्ये 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 84 धावा केल्या. तर मिलरने 19 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 26 धावा केल्या. आरसीबीकडून ग्लेम मॅक्सवेल, मोहम्मद सिराज आणि स्वप्निल सिंह या तिघांनी 1-1 विकेट घेतली.

आरसीबीचा विजयी क्षण

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद आणि मोहित शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि यश दयाल.